Lok Sabha Election 2024 : सातव्या टप्प्यात कुणा-कुणाची आहे अग्निपरीक्षा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील पाच सहकारी, माजी मुख्यमंत्री, बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटाचे स्टार, शिबू सोरेनची सून, लालूंची मुलगी, वीरभद्र यांचा मुलगा या सर्वांचे भाग्य १ जूनला मतपेटीत बंद होणार आहे.

150
Lok Sabha Election 2024 : सातव्या टप्प्यात कुणा-कुणाची आहे अग्निपरीक्षा?
  • वंदना बर्वे

अठराव्या लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहचली असून सातवा टप्प्याची निवडणूक रोमांचक वळणावर आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील पाच सहकारी, माजी मुख्यमंत्री, बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटाचे स्टार, शिबू सोरेनची सून, लालूंची मुलगी, वीरभद्र यांचा मुलगा या सर्वांचे भाग्य १ जूनला मतपेटीत बंद होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५७ जागांवर मतदान होणार आहे. यात उत्तरप्रदेश (१३), पंजाब (१३), पश्चिम बंगाल (९), बिहार (८), ओडिशा (६), झारखंड (३), हिमाचल प्रदेश (४) आणि चंदिगड (१) या राज्यांचा समावेश आहे. एकूण ९०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वाराणसीतून तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी जालंधरमधून मैदानात आहेत. पाच केंद्रीय मंत्र्यांची परीक्षा आहे. या टप्प्यात माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा, मुलगी आणि सून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

वाराणसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने त्यांच्या विरोधात अजय राय यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. बसपाने अतहर जमाल लारी यांना तिकीट दिले आहे. या जागेवर दोन अपक्षांसह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींनी दणदणीत विजय मिळवला होता. मात्र आता विजय ऐतिहासिक बनविण्याची योजना भाजपाने आखली आहे. (Lok Sabha Election 2024)

हमीरपूर 

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा मैदानात उतरले आहेत. हिमाचलचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल यांचे ते चिरंजीव होय. काँग्रेसने ही जागा जिंकण्यासाठी सतपाल रायजादा यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर पाच अपक्षांसह एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

महाराजगंज

केंद्रीय मंत्री पंकज चौधरी उत्तर प्रदेशातील महाराजगंज मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. बसपाने त्यांच्या विरोधात मौसम आलम यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसकडून वीरेंद्र चौधरी निवडणूक लढवत आहेत. तीन अपक्षांसह एकूण आठ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (Lok Sabha Election 2024)

मिर्झापूर 

कालीन भैय्या उर्फ पंकज त्रिपाठी यांच्या मिर्झापूर या वेब सिरिजमुळे मिर्झापूर हे नाव खूप गाजले आहे. याच मिर्झापूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल या निवडणूक लढवित आहेत. त्या अपना दल (सोनेलाल)च्या नेत्या असून रालोआसोबत आहेत. बसपाने मनीष कुमार आणि सपाने रमेश चंद बिंद यांना उमेदवारी दिली आहे. येथे निवडणूक रिंगणात दोन अपक्षांसह एकूण १० उमेदवार आहेत. (Lok Sabha Election 2024)

चंदौली

केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी उत्तर प्रदेशच्या चंदौली मतदारसंघातून दंड थोपटले आहेत. त्यांचा सामना सपाचे माजी मंत्री बिरेंद्र सिंह आणि बसपाचे सत्येंद्र कुमार मौर्य यांच्याशी होणे आहे. या जागेवर एका अपक्षासह एकूण १० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. (Lok Sabha Election 2024)

आरा

केंद्रीय मंत्री आरके सिंह बिहारमधील आरा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. बसपाचे लाल बादशाह सिंह यांच्या तगड्या आव्हानांचा सामना त्यांना करावा लागत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (एमएल) सुदामा प्रसाद यांच्यावर बाजी मारली आहे. पाच अपक्षांसह एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

दुमका 

झारखंडच्या दुमका मतदारसंघात भाजपाने मोठा डाव खेळला आहे. झारखंड मुक्ती मोर्चामध्ये बंडखोरी करणाऱ्या सीता सोरेन येथून भाजपाच्या तिकीटवर लढत आहेत. माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या त्या स्नुषा होत. झारखंड मुक्ती मोर्चाने नलिन सोरेन आणि बसपाकडून परेश मरांडी निवडणूक रिंगणात आहेत. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. अशात त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी मोर्चा सांभाळला आहे. १० अपक्षांसह एकूण १९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. (Lok Sabha Election 2024)

अमृतसर 

भाजपाने पंजाबच्या अमृतसर लोकसभा मतदारसंघातून अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरनजीत सिंग संधू यांना उमेदवारी दिली आहे. आपकडून भगवंत मान सरकारमधील मंत्री कुलदीप सिंह धालीवाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिरोमणी अकाली दलाकडून अनिल जोशी आणि काँग्रेसकडून विद्यमान खासदार गुरजित सिंग औजला निवडणूक लढवत आहेत. १८ अपक्षांसह एकूण ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

जालंधर 

पंजाबमधील जालंधर लोकसभा जागेवरील लढत अत्यंत चुरशीची आहे. येथून पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपाने सुशील कुमार रिंकू यांना उमेदवारी दिली आहे. रिंकू या विद्यमान खासदार असून त्यांनी आपच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. ‘आप’ने पवनकुमार टिनू यांना उमेदवारी दिली आहे. बसपाकडून बलविंदर कुमार आणि शिरोमणी अकाली दलाकडून मोहिंदर सिंग केपी निवडणूक लढवत आहेत. सात अपक्षांसह एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – DPL : धारावीत पहिल्यांदाच रंगणार ‘धारावी प्रीमियर लीग’चा थरार)

लुधियाना

विद्यमान खासदार रवनीत सिंह बिट्टू हे भाजपाच्या तिकीटावर लुधियाना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. ‘आप’ने अशोक पराशर आणि एसएडीने रणजित सिंह ढिल्लन यांना तिकीट दिले आहे. २६ अपक्षांसह एकूण ४३ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

भटिंडा

भटिंडा लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्या हरसिमरत कौर बादल चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. आपने मंत्री गुरप्रीत सिंग खुदिया यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने मोहिंदर सिंग सिद्धू यांना तर भाजपाने माजी आयएएस अधिकारी परमपाल कौर सिद्धू यांना उमेदवारी दिली आहे. आठ अपक्षांसह एकूण १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

पटियाला 

पटियालाच्या विद्यमान खासदार परनीत कौर यावेळी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने मंत्री बलबीर सिंग यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून धरमवीर गांधी आणि एसएडीकडून एनके शर्मा रिंगणात आहेत. १५ अपक्षांसह एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

मंडी

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा जागेवरील लढत रंजक आहे. चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत पहिल्यांदाच भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे हिमाचल सरकारमधील मंत्री आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह त्यांच्यासमोर आहेत. या जागेवर चार अपक्षांसह एकूण १० उमेदवार आहेत. (Lok Sabha Election 2024)

करकट

भोजपुरी स्टार पवन सिंग बिहारमधील करकट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यामुळे ही निवडणूक अधिक रोमांचक झाली आहे. राष्ट्रीय लोक मोर्चाकडून उपेंद्र कुशवाह आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (एमएल) राजा राम सिंह निवडणूक लढवत आहेत. बसपाकडून धीरज कुमार सिंह यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तीन अपक्षांसह एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

गोरखपूर

विद्यमान खासदार आणि भोजपुरी अभिनेता रविकिशन भाजपाच्या तिकीटावर गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सपाने काजल निषाद यांना तिकीट दिले आहे. बसपाकडून जावेद अश्रफ आपले नशीब आजमावत आहेत. गोरखपूरमध्ये चार अपक्षांसह एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (Lok Sabha Election 2024)

मीसा भारती पाटलीपुत्रमधून दोनदा पराभूत झाल्या आहेत

राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या खासदार मीसा भारती पाटलीपुत्रमधून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. बिहारची राजधानी पटना येथे पटना साहिब आणि पाटलीपुत्र असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. राजदला राम रामराम ठोकून भाजपात झालेले रामकृपाल यादव यांनी २०१४ मध्ये याच मतदारसंघातून मीसा भारती यांचा पराभव केला होता. यानंतर त्यांना केंद्रात मंत्री बनविण्यात आले होते. २०१९ मध्येही यादव यांनी मीसा भारती यांना पराभूत केले. यावेळेस मात्र ते मंत्री नाही झाले. (Lok Sabha Election 2024)

आता रामकृपाल यादव पुन्हा एकदा पाटलीपुत्रमधून मीसा भारती यांच्या विरोधात तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. यावेळेस हॅटट्रिक करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मीसा भारती या राज्यसभेच्या सदस्या म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही लालू कुटुंबाने ही जागा आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच लालू प्रसाद यादव इतक्या कडक उन्हातही जनमतासाठी बाहेर पडले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.