18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा (Lok Sabha Speaker) मंगळवार (25 जून) दुसरा दिवस आहे. लोकसभेत आजही शपथविधी सुरू राहणार आहे. पंतप्रधान मोदींसह 266 खासदारांनी शपथ घेतली आहे. उर्वरित खासदार आज शपथ घेणार आहेत. यासोबतच भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आज अध्यक्षांच्या नावाची घोषणा करणार आहे. सोमवारी (२४ जून) रात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी नाव निश्चित करण्यासाठी बैठक घेतली. (Lok Sabha Speaker)
लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे एनडीएच्या उमेदवाराला आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. एनडीएकडून पुन्हा एकदा ओम बिर्ला यांचे नाव निवडले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Lok Sabha Speaker)
भाजप ‘काळा दिवस’ साजरा करणार
25 जून 1975 हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. 1975 मध्ये या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली होती. भाजप आज आणीबाणीच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात काळा दिवस साजरा करणार आहे. (Lok Sabha Speaker)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community