Lok Sabha Vice President : लोकसभा उपाध्यक्ष पदावरून महाभारत होण्याची शक्यता

226
Lok Sabha Vice President : लोकसभा उपाध्यक्ष पदावरून महाभारत होण्याची शक्यता

लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे इंडी आघाडीतील घटक पक्षांच्या अंगात बारा हत्तीचे बळ संचारले आहे. १८ व्या लोकसभेत उपाध्यक्ष पदावर आघाडीकडून दावा केला जाणार आहे. एवढेच नव्हे तर, गरज पडली तर मैदानात उतरण्याची तयारीसुद्धा विरोधी पक्षांनी केली आहे. (Lok Sabha Vice President)

काँग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, इंडी आघाडीतील घटक पक्षांचा आत्मविश्वास गगणाला गवसणी घालणारा आहे. १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीतील घटक पक्षांच्या खूप जागा निवडून आल्या आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे ९८ खासदार आहेत. (Lok Sabha Vice President)

(हेही वाचा – Nitesh Rane: ‘हिंदुधर्म रक्षक…’, नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’बाहेर झळकले बॅनर!)

समजवादी पक्षाचे ३७ खासदार निवडून आले असून समजवादी पक्ष लोकसभेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि त्या पाठोपाठ द्रमुक पक्ष आहे. थोडक्यात, इंडी आघाडी आपले अधिकार मिळविण्यासाठी उतावीळ आहे. मागील दहा वर्षांपासून विरोधी पक्ष नेता नव्हता. २०१९ मध्ये ५२ खासदार असूनही काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळाले नव्हते. त्यापूर्वी सुद्धा हे पद रिक्त होते. (Lok Sabha Vice President)

मात्र आता, विरोधी पक्ष नेत्यासोबतच लोकसभेचे उपाध्यक्ष पद विरोधी पक्षांना मिळावे यासाठी इंडी आघाडी आग्रही राहणार आहे. आतापर्यंतच्या नियमानुसार उपाध्यक्ष पद विरोधी पक्षांनाच मिळत आले होते. मागची टर्म मात्र यास अपवाद होती. संसदेचे अधिवेशन २४ जूनपासून सुरु होत आहे. विरोध पक्षांनी रणनीती ठरविण्यासाठी अद्याप कोणतीही बैठक बोलाविलेली नाही. ही बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. इंडी आघाडीला पक्षाच्या वाढलेल्या जागा आणि काँग्रेसला मिळालेलं विरोधी पक्ष नेतेपद या दोन्ही गोष्टीमुळे विरोधकांची ताकद वाढली आहे. यामुळे, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची दाट शक्यता आहे. (Lok Sabha Vice President)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.