Narayan Rane : लोकसभेच्या विजयाचा फायदा पदवीधर निवडणुकीत होईल – नारायण राणे

163
Narayan Rane : लोकसभेच्या विजयाचा फायदा पदवीधर निवडणुकीत होईल - नारायण राणे

लोकसभा निवडणुकीत आपला विजय होणार आहे, त्याचा फायदा आपल्याला कोकण पदवीधर निवडणुकीत नक्कीच होईल. पण या पदवीधर निवडणुकीची मतदानाची पद्धत समजावून घ्या आणि ती मतदारांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. (Narayan Rane)

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपला विजय होणार आहे, त्याचा फायदा आपल्याला कोकण पदवीधर निवडणुकीत नक्कीच होईल. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी चॅनल काम केले. मेहनत केली. पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही इतर निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. मतदान करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याविषयी आपण जाणून घ्या. जिल्ह्यात १८ हजार ५६४ मतदार आहेत. पण महायुतीच्या कार्यकर्त्यांची संख्या त्याहून मोठी आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यात, जिल्हा परिषदेच्या मतदार संघात मतदान किती आहे याचा अभ्यास करावा, योग्य नियोजन करावे, असे केले तर या निवडणुकीत विजय आपलाच होईल हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही.

(हेही वाचा – Mumbai Police : १० हजार द्या महिनाभर सुट्टीवर जा; सशस्त्र पोलीस दलातील ‘हजेरी सेटिंग’ एसीबीच्या कारवाईमुळे उघड)

पदवीधर मतदानरांना देशाला कोणाची गरज आहे ते माहित आहे. विकास कोकण करू शकतो हे त्यांना माहित आहे. कोणती विचारसरणी देश मजबूत करू शकतो हे पदवीधरांना माहित आहे. त्यामुळे या पदवीधर मतदारांकडे जाणे आणि विनंती करणे एवढे काम केल्यास ही निवडणूक जिंकणे कठीण नाही. गेली निवडणूक आम्ही अनुभवली आहे. मित्र पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांशी कसे वागतात हे आपण अनुभवले आहे. पण त्याहीपेक्षा यावेळी पक्षावरची निष्ठा जास्त दाखवा. सिंधुदुर्ग जिल्हा हा अन्य जिल्ह्यांपेक्षा वेगळा आहे. या निवडणुकीत आपण जास्तीत जास्त मतदान करून दहावी-बारावी च्या निकालाप्रमाणे आपले वेगळेपण दाखवून द्या. त्यामुळे आवडलं दर्जाचे कार्यकर्ते देखील सिंधुदुर्गात आहेत असा संदेश सर्वाना मिळेल. (Narayan Rane)

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर निवडणुकीच्या वेगळ्या मतदानाची माहिती सर्वांना करून दिली. मतदान करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, हे मतदारांना सांगा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मतदानाची पद्धती पदवीधरांपर्यंत पोहोचावा असे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. यावेळी आमदार नितेश राणे, प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, अशोक दळवी, अबिद नाईक, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दहावी परीक्षेमध्ये १०० टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली आलेली सौजन्या संजय घाटकर हिचा सत्कार करण्यात आला. या आढावा बैठकीला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रणजित देसाई यांनी केले. (Narayan Rane)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.