मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधक हंगामा करीत असल्यामुळे लोकसभेची कारवाई दिवसभरासाठी तहकूब करावी लागली. मात्र, विरोधकांनी बहिर्गमन केल्यामुळे राज्यसभेत कामकाज सुरू आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी लोकसभेचे काम पुन्हा एकदा विरोधकांच्या गोंधळामुळे बाधित झाले. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांना लोकसभेत गोंधळ घालायला सुरवात केली. यामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर दोन वाजता कारवाई सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली. विरोधक जुमानत नसल्यामुळे नाईलाजाने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सरकारने मंगळवारी लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक मांडले होते, त्यावर आज चर्चा होणार होती, मात्र गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही.
(हेही वाचा Congress : काँग्रेसचा नामनिर्वाचित विरोधी पक्षनेता ‘एकांडा शिलेदार’)
Join Our WhatsApp Community