Loksabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात 17.7 कोटी मतदार करणार उमेदवारांचे भविष्य सीलबंद

Loksabha Election 2024 : भारतीय हवामानशास्त्र विभाग-आयएमडीच्या अंदाजानुसार चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदानाच्या दिवशी उष्णतेच्या लाटेची शक्यता नसून चिंतेचे कारण नाही.

118
Loksabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात 17.7 कोटी मतदार करणार उमेदवारांचे भविष्य सीलबंद
Loksabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात 17.7 कोटी मतदार करणार उमेदवारांचे भविष्य सीलबंद

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उद्या (13 मे 2024) होणार असलेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission of India) सज्ज आहे. या चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील (9 राज्ये 1 केंद्रशासित प्रदेश) 96 लोकसभा मतदारसंघांसाठी (Loksabha Election 2024) मतदान होईल. बरोबरीने एकाच वेळी आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) विधानसभेच्या 175 जागा आणि ओडिशा विधानसभेच्या 28 जागांसाठीही या टप्प्यात मतदान होणार आहे. तेलंगणातील 17 लोकसभा मतदारसंघांतील काही विधानसभा क्षेत्रातल्या मतदानाची वेळ (सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत), मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आयोगाने वाढवली आहे.

(हेही वाचा – Aurora Forecast : जगातील सर्वात मोठे सौर वादळ; रंगांनी भरून गेले आकाश)

भारतीय हवामानशास्त्र विभाग-आयएमडीच्या अंदाजानुसार चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदानाच्या दिवशी उष्णतेच्या लाटेची शक्यता नसून चिंतेचे कारण नाही. चौथ्या टप्प्यातील या मतदारसंघांमध्ये सामान्य ते सामान्य तापमानापेक्षा कमी (±2 अंश) तापमानाचा अंदाज, हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर पाणी, शामियाना, पंखे आदी सुविधांसह चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत, 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 283 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले आहे. सर्व टप्प्यांची मिळून एकत्रित मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

चौथ्या टप्प्याची वस्तुस्थितीजन्य माहिती

1. लोकसभेची सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या चौथ्या टप्प्यात 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघांसाठी (अनारक्षित-64; अनुसूचित जमाती- 12; अनुसूचित जाती-20) 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरु होऊन संध्याकाळी 6 वाजता संपेल.

2. या चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या जागांसह आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या 175 जागा (अनारक्षित-139; अनुसूचित जमाती-7; अनुसूचित जाती-29) आणि ओडिशा विधानसभेच्या 28 जागांसाठी (अनारक्षित-11; अनुसूचित जमाती-14; अनुसूचित जाती-3) 13 मे रोजी एकाच वेळी मतदान होणार आहे.

3. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक (Loksabha Election 2024) 2024 च्या चौथ्या टप्प्यात 10 राज्य/केंद्रशासित प्रदेश मिळून 1717 उमेदवार रिंगणात आहेत. चौथ्या टप्प्यातील प्रत्येक मतदारसंघात सरासरी 18 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

4. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेकरता निवडणूक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची ने-आण करण्यासाठी तीन राज्यांमध्ये (आंध्र प्रदेश -02, झारखंड- 108, ओडिशा -12) 122 हवाई फेऱ्या करण्यात आल्या आहेत.

5. सुमारे 1.92 लाख मतदान केंद्रांवर 19 लाख मतदान अधिकारी सुमारे 17.7 कोटी मतदारांचे स्वागत करतील.

6. सुमारे 17.70 कोटी मतदारांमध्ये 8.97 कोटी पुरुष आणि 8.73 कोटी महिला मतदारांचा समावेश

7. चौथ्या टप्प्याच्या मतदानात 85 वर्षांहून अधिक वयाचे 12.49 लाख मतदार, तर 19.99 लाख नोंदणीकृत दिव्यांग मतदार असून सुविधेसाठी त्यांना घरून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. घरून मतदान करण्याच्या पर्यायी व्यवस्थेची याआधीच मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.