Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंविरोधात आशिष शेलारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार!

245
Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंविरोधात आशिष शेलारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार!
Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंविरोधात आशिष शेलारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार!

उद्धव ठाकरेंविरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार (Loksabha Election 2024) केली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केल्याचं तक्रारीत म्हटल आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपवर चुकीचे आरोप केले आणि निवडणूक आयोगावरही आरोप केलेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली. (Loksabha Election 2024)

कितीही उशीर झाला तरी हटू नका मतदान करा: उद्धव ठाकरे

मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संतापले. निवडणूक आयोग (Election Commission) पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी सेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला. तसंच कितीही उशीर झाला तरी हटू नका मतदान करा, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केले होते. (Loksabha Election 2024)

भाजपाची तक्रार काय?

उद्धव ठाकरेंनी आज (दि.20) दुपारी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. दरम्यान, ठाकरेंनी पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले, तेच मुद्दे निवडणूक आयोगापुढे शेलार यांनी मांडले आहेत. ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली, असं म्हणत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी कारवाईची मागणी केली आहे. (Loksabha Election 2024)

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे. असंही ठाकरेंनी म्हटलं होतं. (Loksabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.