Loksabha Election 2024 : पियूष गोयल कुठून लढणार ? महाराष्ट्र की मेरठ ?

Loksabha Election 2024 : मागील पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीतही केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरविले जाणार आहे. विशेषत: जे मंत्री राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जात आहे.

257
Loksabha Election 2024 : पियूष गोयल कुठून लढणार ? महाराष्ट्र कि मेरठ ?
Loksabha Election 2024 : पियूष गोयल कुठून लढणार ? महाराष्ट्र कि मेरठ ?

वंदना बर्वे

मागील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीप्रमाणे लोकसभेच्या आगामी निवडणुकीतही केंद्रीय मंत्र्यांची फौज उमेदवार म्हणून मैदानात बघायला मिळणार आहे. यात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यापासून ते नारायण राणे यांच्यापर्यंतची चर्चा आहे. यात वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची उमेदवारी 440 व्हॉल्टचा धक्का देणारी ठरू शकते. गोयल मुंबईतून लढणार अशी चर्चा असली तरी; भाजप त्यांच्या नावाचा विचार आणखी एका मतदारसंघासाठी करीत आहे. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Srikalahasti Temple : आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीचे शक्तीस्थान)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीत चारशे खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील रणनीतीकार हे लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील समीकरणाचा बारकाईने अभ्यास करीत आहेत. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्यापासून ते उमेदवारांची निवड करतांना कोणतीही चूक होणार नाही, याची खास काळजी घेतली जात आहे.

केंद्रीय मंत्री लोकसभेच्या मैदानात

मागील पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीतही केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरविले जाणार आहे. विशेषत: जे मंत्री राज्यसभेचे सदस्य आहेत. यात अर्थमंत्री निर्मला सीतारामण, परराष्ट्र मंत्री एस. सुब्रमण्यम, नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधाण, हरदीपसिंग पुरी, गजेंद्रसिंग शेखावत आणि पियूष गोयल अशी मोठी यादी आहे. या सर्वांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले जाणार आहे. सर्व मंत्र्यांना त्यांच्या गृहराज्यातून लढविले जाणार आहे.

महाराष्ट्र नाही अन् हरियाणाही नाही !

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ब्यू आईड ब्वाय’ म्हणून ओळखले जाणारे मंत्री पियूष गोयल यास अपवाद ठरू शकतात. सध्या, उत्तर मुंबईतून गोयल यांना मैदानात उतरविले जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु, पंतप्रधान कधी 440 व्हॉल्टचा धक्का देतील सांगता येत नाही. सध्या भाजप मुख्यालयात जी कुजबूज कानावर येत आहे, ती अशी की, पियूष गोयल यांना कर्मभूमि महाराष्ट्र किंवा त्यांचे पूर्वज रहायचे, त्या हरियाणातून नव्हे, तर एका वेगळ्याच राज्यातून लोकसभेच्या मैदानात उतरविले जावू शकते. पियूष गोयल यांचे मूळ राज्य म्हणजे हरियाणा. महाराष्ट्र (Maharashtra) ही त्यांच्या आई आणि वडिलांची कर्मभूमी होय.

(हेही वाचा – Ind vs Eng Test Match : भारताचा इंग्लंडवर ५ विकेट्सने विजय; ३ – १ ने मालिकाही खिशात)

यूपीच्या ‘या’ मतदारसंघातून गोयल लढणार निवडणूक

पियूष गोयल यांच्या नावाचा विचार उत्तरप्रदेशातील भाजपचा (BJP) गड मानल्या जाणाऱ्या एका मतदारसंघासाठी होत आहे. सध्या मागील तीन निवडणुकांपासून या मतदारसंघावर भाजपचा ताबा आहे. हा मतदारसंघ म्हणजे मेरठ (Meerut). राजेंद्र अग्रवाल मागील गेल्या तीन टर्मपासून मेरठ-हापूडमधून लोकसभेवर निवडून जात आहेत. येथे बनिया मतदारांचा (Uttarpradesh) बोलबाला आहे. शेतकरी, दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा बरीच आहे. दलित मतांबाबत बोलायचे झाले, तर मायावती यांचा बहुजन समाज पक्ष भाजपची बी टीम म्हणूनच ओळखली जाते. अशात मेरठची जमीन गोयल यांच्यासाठी सुपिक आहे.

…म्हणून जयंत चौधरी यांना सपापासून वेगळे केले

भारताच्या राजकारणाचे तरबेज खेळाडू म्हणून ओळखले जाणारे पियूष गोयल (Piyush Goyal) यांनीच रालोदचे जयंत चौधरी यांना समाजवादी पक्षापासून वेगळे करण्याची पटकथा लिहिली होती, असे म्हणतात. चौधरी यांना इंडी आघाडीपासून रालोआत आणले, तर शेतकरी आणि जाट मते आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळतील आणि आपण भरघोस मतांनी विजयी होवू, ही त्या योजनेमागची कल्पना होती, अशी चर्चा आहे. (Loksabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.