लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) पक्षाच्या उमेदवारांच्या नावांना अंतिम रूप देण्यासाठी काल गुरुवारी रात्री उशिरा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक झाली. बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य सदस्यांनी उमेदवारांची पहिली यादी अंतिम करण्यावर विचारमंथन केले. पूर्वीप्रमाणे यावेळीही अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देऊन गमावलेल्या जागांवर विजय मिळविण्याची रणनीती भाजपाने आखली असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरात सुरु केली आहे. दरम्यान, आता उमेदवार निवडीबाबत पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याबाबत काल रात्री भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक झाली. बैठकीत पंतप्रधान मोदींसह सदस्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी अंतिम करण्यावर विचारमंथन केले. (Lok Sabha Election 2024)
राज्यातील नेत्यांसोबत उमेदवारांवर विचारमंथन
आगामी लोकसभा निवडणुका एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी या सर्व मुख्यमंत्र्यांनी बैठकीला हजेरी लावली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : धरमशाला कसोटीत रोहितला संधी गौतम गंभीरला मागे टाकण्याची)
गमावलेल्या जागांवर अधिक लक्ष द्या
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत २०१९ च्या निवडणुकीत ज्या उमेदवारांवर भाजपाचा पराभव झाला होता आणि ज्या उमेदवारांवर भाजपाने आपली शक्यता सुधारण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यांच्या जागांवर चर्चा झाली. (Lok Sabha Election 2024)
भाजपाची लवकरच पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह काही विश्वासू आणि मोठ्या चेहऱ्यांच्या नावांचा समावेश या यादीत असेल अशी चर्चा आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशात भाजपा ७४ जागांवर निवडणूक लढवणार आहे तर मित्रपक्षांना ६ जागा मिळतील अशी शक्यता आहे. भाजपा आरएलडीसाठी लोकसभेच्या २ जागा, अपना दलासाठी २ लोकसभेच्या जागा आणि इतर मित्रपक्षांसांठी २ जागा सोडणार आहे. गुरुवारी रात्री भाजपाने वाराणसीसह लोकसभेच्या सुमारे ५० जागांसाठी उमेदवार निश्चित केल्याची माहिती आहे. भारतीय जनता पार्टी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज शुक्रवारी जाहीर करू शकते. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सुमारे १०० जणांची नावे समाविष्ट असल्याची चर्चा आहे. भाजपा १० मार्चपूर्वी ३०० उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या काही आठवडे आधी म्हणजे २१ मार्च रोजी भाजपाने १६४ उमेदवारांची घोषणा केली होती. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : धरमशाला कसोटीतून के एल राहुल आऊट, बुमरा इन)
काही राज्यात युतीची शक्यता
पंजाब, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये उमेदवारांचा निर्णय भाजपाकडून लांबणीवर टाकण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या तीन राज्यांमध्ये प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांशी युती करण्यासाठी भाजपाची चर्चा सुरू आहे. भाजपा पंजाबमध्ये अकाली दल, आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी या पक्षांशी राजकीय समीकरणाबाबत उत्सुक आहे. तर तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकशी भाजपाची चर्चा सुरू आहे. (Lok Sabha Election 2024)
मोठ्या चेहऱ्यांचे तिकीट कापले जाऊ शकते
दरम्यान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान आणि मनसुख मांडविया यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उभे केले जाऊ शकते. कारण पक्षाने त्यांना राज्यसभा निवडणुकीतही उभे केले नव्हते. याशिवाय काही महत्वाच्या जागांवर पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो. अशात नामवंत बड्या चेहऱ्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community