लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम १६ मार्च रोजी घोषित झाल्याने आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. आचारसंहितेचा कुठेही भंग होऊ नये, यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींना दहापेक्षा अधिक मोटार गाड्या वाहनांच्या ताफ्याचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Loksabha Election 2024)
(हेही वाचा – BJP Candidate Third List : भाजपाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी)
जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक
नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करताना स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. तसेच, परवानगी संपल्यानंतर ते दूर करून इमारती, मालमत्ता पूर्ववत करून घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक आहे. निवडणूक काळात सार्वजनिक मालमत्ता विद्रूप करण्यास निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये/संस्था आणि शासकीय विश्रामगृह परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास किंवा त्यांच्या प्रतिनिधीस सभा घेण्यास मनाई केली आहे.
नमुना मतपत्रिका छापाल तर कारवाई
राजकीय पक्षाच्या उमेदवाराचे नाव व त्यांना नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे व आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापता येणार नाही. (Loksabha Election 2024)
Join Our WhatsApp Community