Loksabha Election 2024 : पंतप्रधानपदावरून काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था; खर्गे नव्हे, राहुल गांधीच नेत्यांची पसंती

188
Loksabha Election 2024 : पंतप्रधानपदावरून काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था; खर्गे नव्हे, राहुल गांधीच नेत्यांची पसंती
Loksabha Election 2024 : पंतप्रधानपदावरून काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था; खर्गे नव्हे, राहुल गांधीच नेत्यांची पसंती
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव समोर आल्यानंतर आता काँग्रेस पक्षातच वेगवेगळे सूर उमटू लागले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी थेट राहुल गांधी यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळली आहेत. सिद्धरामय्यांचे हे वक्तव्य इंडिया आघाडीच्या बैठकीतील प्रस्तावाच्या विपरीत आहे. या बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी खर्गे यांनी सध्याच पंतप्रधानपदावर भाष्य न करण्याचे वक्तव्यही केले होते.

(हेही वाचा-PM Narendra Modi : रोजगार वाढवणे हे सरकारचे सर्वोच्च उद्दिष्ट)

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे समर्थन राहुल गांधी यांच्या नावासाठी आहे. असे असतानाही इंडिया आघाडीमध्ये बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खर्गे (Loksabha Election 2024) यांचे नाव पुढे केल्याने काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठेतरी धुसपुस दिसून येत आहे.काल याचा प्रतिबिंब बैठकीत उमटले असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयासाठी राहुल गांधी देशभर पायी दौरे करत असताना त्यांना त्याचे फळ मिळालेच पाहिजे असा सूर देखील बैठकीतला निघत होता.
४ जानेवारीला काँग्रेसची पुन्हा एकदा बैठक
काँग्रेसची ४ जानेवारीला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, महासचिव यांची बैठक होणार आहे. त्यानंतर ज्या १४ राज्यांमध्ये भारत न्याय यात्रा जाणार त्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. या यात्रेचं ४ जानेवारीला यात्रेचा लोगो आणि डिझाईन प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर ८ जानेवारीला यात्रेचा मार्ग सांगितला जाणार आहे. तसेच १२ जानेवारीला यात्रेचे थीम साँग लॉन्च होणार आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=5xLfbqlKySw

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.