Loksabha Election 2024 : राज्यातील १० दिग्गजांना मोठा धक्का; नवनीत राणा, पंकजा मुंडे पिछाडीवर

Loksabha Election 2024 : राज्यातील मतमोजणीमध्ये सकाळपर्यंत महाविकास आघाडीला 25 ठिकाणी आघाडी मिळाल्याचं चित्र होतं, तर महायुती 22 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

101
Loksabha Election 2024 : राज्यातील १० दिग्गजांना मोठा धक्का; नवनीत राणा, पंकजा मुंडे पिछाडीवर
Loksabha Election 2024 : राज्यातील १० दिग्गजांना मोठा धक्का; नवनीत राणा, पंकजा मुंडे पिछाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) निकालातील आघाडी-पिछाडीची आकडेवारी पुढे येत आहे. भाजपने (BJP) ४०० पारचा नारा दिला असला, तरी प्रत्यक्षात येणाऱ्या निकालांमध्ये भाजप आणि इंडि आघाडी यांच्यात अटीतटीची लढत झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये आलेल्या निकालांनुसार महाराष्ट्रातील काही दिग्गजांना धक्का मिळणार असल्याचे चित्र आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election Live Update: धाराशिवमध्ये ओमराजे ७३ हजार मतांनी आघाडीवर, तर नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे ९४,००० मतांनी पुढे)

राज्यातील मतमोजणीमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत महाविकास आघाडीला 25 ठिकाणी आघाडी मिळाल्याचं चित्र होतं, तर महायुती 22 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

कोणते दिग्गज पिछाडीवर ?

नवनीत राणा (Navneet Rana) – भाजप
नारायण राणे – भाजप
सुधीर मुनगंटीवार- भाजप
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) – राष्ट्रवादी काँग्रेस
पंकजा मुंडे (Pankaja Munde) – भाजप
उदयनराजे- भाजप
संजयकाका पाटील – भाजप
राम सातपुते- भाजप
रणजीत निंबाळकर- माढा
आढळराव पाटील – राष्ट्रवादी
रवींद्र धंगेकर- काँग्रेस

शिरुर लोकसभा मतदारसंघातही सकाळी 11 वाजेपर्यंतचे आकडे हाती आले असून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात होते. सध्याच्या घडीला अमोल कोल्हे हे 33200 मतांनी आघाडीवर आहेत. ही सकाळी अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी असून अंतिम निकाल हाती येण्यास काही वेळ लागेल. (Loksabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.