Loksabha Election 2024 : भाजपकडून हिमाचलमधून कंगना रणौतला उमेदवारी; श्रीरामही निवडणुकीच्या रिंगणात

184
Loksabha Election 2024 : भाजपकडून हिमाचलमधून कंगना रणौतला उमेदवारी; श्रीरामही निवडणुकीच्या रिंगणात
Loksabha Election 2024 : भाजपकडून हिमाचलमधून कंगना रणौतला उमेदवारी; श्रीरामही निवडणुकीच्या रिंगणात

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पाचवी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. (BJP Candidates 5th List) या वेळी भाजपने हिमाचल प्रदेशमधून अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपच्या वतीनं आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या उमेदवार यादीमध्ये एकूण 111 उमेदवारांची नावे आहेत. अभिनेत्री कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी संधी देण्यात आली आहे. भाजपची ही उमेदवार यादी म्हणजे एक मोठा उलटफेर ठरत असून, त्यात वरुण गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांची नावं वगळण्यात आल्यामुळं राजकीय वर्तुळात बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Ravindra Kelekar : कोंकणी साहित्यिक रवींद्र राजाराम केळेकर)

कोणकोणत्या दिग्गजांची नावं यादीतून वगळली ?

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वी के सिंह यांच्या जागी गाजियाबादमधून स्थानिक नेते अतुल गर्ग यांना संधी देण्यात आली आहे. तर, बिहारच्या बक्सर येथून केंद्रीय मंत्री अतूल चौबे यांना वगळून त्या जागेवर मिथिलेश तिवारी यांना तिकीट दिलं आहे. पीलीभीत येथून वरुण गांधी या मोठ्या नावाला बगल देत भाजपनं राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या नावे उमेदवारी बहाल केली आहे. तर, मनेका गांधी यांना पुन्हा एकदा सुलतानपूर येथून निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं. आहे.

महाराष्ट्रातून कोणाला संधी ?

फक्त कंगना रणौतच नव्हे, तर, मेरठमधून भाजपने प्रभु श्रीरामालाही निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. प्रचंड गाजलेल्या प्रभु श्रीराम मालिकेत रामाची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. दरम्यान भाजपकडून पाचव्या यादीत बऱ्याच दिग्गजांना वगळण्यात आले आहे. पाचवी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली तिथं पक्षाकडून भंडारा- गोंदिया मतदार संघातून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा एकदा संधी दिली. शिवाय अशोक नेते यांनाही संधी मिळाली असून ते मागील 10 वर्षे गडचिरोली येथून खासदार राहिले आहेत. (Loksabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.