Lok Sabha Election : मायावतींना मिळणार दक्षिणेची सोबत

बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दोन्ही पक्षांतील आघाडीची घोषणा केली आहे. दोन्ही पक्ष विविध मुद्यांवर एकत्रितपणे लढतील. जागावाटपावर लवकर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केसीआर यांनी दिली.

218
Loksabha Election : मायावतींना मिळणार दक्षिणेची सोबत

बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनी उत्तर प्रदेश मध्ये कोणत्याही पक्षांसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दक्षिणेमध्ये भारत राष्ट्र समितीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच मायावतींनी (Mayawati) दक्षिणेत शिरकाव केला असून भारत राष्ट्र समितीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे. (Lok Sabha Election)

बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दोन्ही पक्षांतील आघाडीची घोषणा केली आहे. दोन्ही पक्ष विविध मुद्यांवर एकत्रितपणे लढतील. जागावाटपावर लवकर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केसीआर यांनी दिली. केसीआर आणि बीएसपीचे तेलंगणा प्रमुख आर. एस. प्रविण कुमार यांच्यात झालेल्या बैठकीत आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तेलंगणामध्ये लोकसभेच्या (Lok Sabha Election) १७ जागा आहेत. मागील निवडणुकीत बीआरएसला नऊ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता राज्यातील सत्ता गेल्यानंतर काही विद्यमान खासदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. आगामी निवडणुकीत बीआरएसला केवळ तीन ते चार जागा मिळतील, असा अंदाज विविध सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – संदेशखालीमध्ये जे घडले ते पाहून मान शरमेने खाली झुकेल; PM Narendra Modi यांची जोरदार टीका)

या पार्श्वभूमीवर केसीआर यांनी बीएसपीला सोबत घेतले आहे. मात्र, राज्यात मायावतींच्या (Mayawati) पक्षाचा तितकासा प्रभाव नाही. त्यामुळे या आघाडीचा केसीआर यांना कितपत फायदा मिळेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, केसीआर यांनी चार उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तीन विद्यमान खासदार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी तातडीने ही यादी प्रसिध्द केली. दोन खासदार भाजपामध्ये तर एका खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही पदाधिकारीही पक्ष सोडून जात असल्याने केसीआर यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे ते तेलंगणासह देशात इतर ठिकाणीही पक्षविस्तारासाठी प्रयत्नशील आहेत. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.