देशभरासह आज महाराष्ट्रातही लोकसभेच्या (Loksabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून विदर्भात आज मतदान होत आहे. रामटेकमध्ये एका नवरदेवाने लग्न मंडपात जाण्यापूर्वी मतदानाचं कर्तव्य बजावलं आहे. लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी तो नवरदेव मतदान केंद्रावर गेला आणि आधी त्याने मतदानाचा हक्क बजावला. (Loksabha Election 2024)
लग्न मंडपात जाण्यापूर्वी तो मतदान केंद्रावर आला
स्वप्नील डांगरे (Swapnil Dangre) असे त्या तरूणाचे नाव असून लग्न मंडपात जाण्यापूर्वी तो मतदान केंद्रावर आला, अन् तेथे त्याने मतदानाचा हक्क बजावला. योग्य लोकप्रतिनिधी (Loksabha Election 2024) निवडण्यासाठी आपण मतदान केलं असं स्वप्नीलने सांगितले. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्याने नागरिकांना केलं. नवरदेवाचा हा उत्साह पाहून लोकं त्याचे कौतुक करत आहेत. रामटेकमध्ये महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे अशी लढत आहे. (Loksabha Election 2024)
हे पहा –
Join Our WhatsApp Community