Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाने घेतला लोकसभा निवडणुकीचा आढावा, नोंदवली निरीक्षणे; जाणून घ्या…

127
Loksabha Election 2024 : महाराष्ट्राचं राजकारण जातींभोवती फिरतंय, लोकसभेच्या प्रचारातही नेत्यांकडून हीच रणनीती
Loksabha Election 2024 : महाराष्ट्राचं राजकारण जातींभोवती फिरतंय, लोकसभेच्या प्रचारातही नेत्यांकडून हीच रणनीती

राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४च्या (Loksabha Election 2024) अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्याकरिता नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार (सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा), विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा (सेवानिवृत्त भारतीय पोलीस सेवा) यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा मंत्रालयात घेतला.

महाराष्ट्रामध्ये एकूण ४८ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये सुरू असलेली तयारी, निवडणुकीचे कामकाज पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ, निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्था, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून सर्व तयारीची माहिती यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

(हेही वाचा – Indian Army: युद्धसज्जता, संरक्षण सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतीय लष्कर आखतेय नवीन योजना; लष्कर अधिकाऱ्यांनी बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय)

यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी, यासह निवडणूक विभागाचे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.