‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा केरळमधील युवतींचे धर्मांतर आणि त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ढकलणे यावर आधारित आहे. हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी खूपच चर्चेत आला होता. पंतप्रधानांसह भाजपाच्या सर्वच नेत्यांनी या चित्रपटाचा प्रचार केला होता. सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेला आणि अदा शर्माची भूमिका असलेला हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा चर्चेत आला आहे. दूरदर्शनवर हा चित्रपट दाखविल्यानंतर तेथील साम्यवादी पक्षांनी थयथयाट चालू केला आहे. कवी व पत्रकार के.जी. सूरज यांनी या चित्रपटाच्या प्रसारणाविरोधात केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) धाव घेतली आहे. लोकसभेची निवडणूक पार पडेपर्यंत या चित्रपटाचे प्रसारण पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र न्यायालयाने या प्रसारणावर बंदी आणण्यास नकार दिला आहे. (Loksabha Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : हातात कॉंग्रेसची कमांड; पण काडीची नाही डिमांड!)
राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप
२०२३ च्या मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सत्ताधारी मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून, तसेच काँग्रेसकडून भारतीय निवडणूक आयोगाकडे या चित्रपटाच्या प्रसारणाविरोधात स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी दूरदर्शनला या चित्रपटाचे प्रसारण थांबविण्यास सांगितले होते.
मुख्यमंत्र्यांनी ४ एप्रिल रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “दूरदर्शनसारख्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारतंत्राचा भाग होऊ नये. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक तणाव वाढविणारे हे प्रसारण त्यांनी तातडीने बंद करावे. द्वेषभावनेला खतपाणी घालणाऱ्या या प्रकारच्या प्रयत्नांच्या विरोधात केरळ नक्कीच उभा राहील.” दुसरीकडे भाजपाचे मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी या चित्रपटाचे कौतुक करीत म्हटले आहे, “घटनेमध्ये कला आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.”
‘द केरळ स्टोरी’ ची काय आहे कथा?
द केरला स्टोरी या चित्रपटाची कथा एका तरुणीभोवती फिरते. त्यामध्ये एका हिंदू तरुणीला फसवून आणि धार्मिक जाळ्यात ओढून मुस्लीम केले जाते. त्यानंतर तिला आयसिसकडे पाठवले जाते, अशी ही कथा आहे. आजवर हजारो तरुणींना याच प्रकारे फसवून धर्मांतरित करून आयसिसकडे पाठवण्यात आलं आहे, असे निर्मात्यांनी सांगितले.
वायनाडमधून राहुल गांधींच्या विरोधात उभे असलेले केरळ भाजपचे प्रमुख के. सुरेंद्रन यांनी याबाबत आपले मत मांडताना म्हटले आहे की, केरळमधील लोकांनी मनापासून या चित्रपटाचे स्वागत केले आहे. (Loksabha Election 2024)
हेही पहा –