Lok Sabha Election 2024 : … तर नरेंद्र मोदी मारणार एका दगडात दोन पक्षी

गेल्या 62 वर्षात जवाहरलाल नेहरूंशिवाय कुणालाही सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होता आले नाही 1984 मध्ये काँग्रेसला मिळालेले विक्रमी बहुमत ओलांडण्याचाही प्रयत्न होऊ शकतो.

310
Lok Sabha Election 2024 : निर्भया केस लढणाऱ्या सीमा कुशवाह भाजपामध्ये दाखल
Lok Sabha Election 2024 : निर्भया केस लढणाऱ्या सीमा कुशवाह भाजपामध्ये दाखल

वंदना बर्वे

पंडित जवाहरलाल नेहरू सोडले, तर स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सलग तिसऱ्यांदा कुणालाही विजय मिळवता आला नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यंदाच्या निवडणुकीत हा विक्रम स्वत:च्या नावावर करू शकतात. याबाबत स्वत: पंतप्रधान आश्वस्त दिसून येत आहेत. एवढेच नव्हे तर, 1984 मध्ये काँग्रेसच्या (Congress) नावावर असलेला 415 जागा जिंकण्याचा विक्रमही मोदी यांच्या नेतृत्वात रालोआ मोडून काढू शकते.

(हेही वाचा- CM Eknath Shinde : आता MMRDA क्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मागील 10 वर्षांत असे कितीतरी धाडसी निर्णय घेतले आहेत, जे दुसऱ्या नेत्याला सहजासहजी घेता आले नसते. आता 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) ते आणखी एक वेगळा रेकॉर्ड बनविण्याच्या मार्गावर आहेत. तो रेकॉर्ड म्हणजे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा !

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Pandit Nehru) सोडले, तर आतापर्यंत एकाही नेत्याला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होता आले नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यास अपवाद ठरू शकतात. या वेळी त्यांनी ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला आहे. यात भाजपला (BJP) यश आले, तर नरेंद्र मोदी  (Narendra Modi) सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील.

याशिवाय 1984 मध्ये काँग्रेसने (Congress) जिंकलेल्या 415 जागांचा विक्रमही मोडून काढण्यात रालोआला या वेळी यश मिळू शकते. पंतप्रधान मोदी याबाबत फार आश्वस्त दिसून येत आहेत, हे जास्त महत्त्वाचे आहे. 1984 मध्ये काँग्रेसला 48.5 टक्के मते मिळाली होती. या वेळी भाजपने (BJP) त्यांना मागे टाकण्याची तयारी केली आहे.


तिसऱ्यांदा जनादेशाकडे मोदी 

भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी इंडी आघाडीतील विरोधी पक्ष एकजूट झाले आहेत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, याची संपूर्ण काळजी त्यांच्याकडून घेतली जात आहे. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात आतापर्यंत लोकसभेच्या 17 निवडणुका झाल्या आहेत. आताची निवडणूक ही 18 वी असेल. या काळात पंडित नेहरू (Pandit Nehru) यांना सोडले, तर अन्य कोणत्याही नेत्याला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होता आले नाही. यापूर्वी इंदिरा गांधी तीनवेळा पंतप्रधान झाल्या होत्या. परंतु, त्या सलग झाल्या नव्हत्या. त्यात खंड पडला होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही तिसरी टर्म मिळविता आली नव्हती.


देशाची धुरा दिग्गजांच्या हाती राहिली
देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये पंतप्रधान झालेल्या पंडित नेहरूंच्या (Pandit Nehru) नेतृत्वाखाली काँग्रेसने 1952, 1957 आणि 1962 च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात यश मिळवले होते. दरम्यान, 1964 मध्ये पंडित नेहरूंच्या (Pandit Nehru) निधनानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. पण 1966 मध्ये त्यांचेही निधन झाले आणि त्यांना लोकसभा निवडणुकीत जनादेश मागण्याची संधी मिळाली नाही.


शास्त्री पंतप्रधान झाले

शास्त्री यांच्यानंतर इंदिरा गांधींनी देशाची सूत्रे हाती घेतली आणि 1967 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (Congress) पुन्हा सत्तेवर आली. पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश हा नवीन देश बनविला. यानंतर 1972 मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळाले आणि त्या पंतप्रधान झाल्या. परंतु 1977 मध्ये आणीबाणी लादली गेली आणि तेव्हा झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. अर्थात त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळविता आले नाही.

मोरारजी देसाई पंतप्रधान झाले

1977 मध्ये जनता सरकारचे पंतप्रधान झालेले मोराराजी देसाई 1979 मध्ये पडले आणि त्यांना पंतप्रधान म्हणून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही. देसाईंच्या जागी चौधरी चरणसिंग पंतप्रधान झाल्यामुळे 1980 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) इंदिरा गांधींना तिसरी टर्म नक्कीच मिळाली, पण तीन वर्षांच्या ब्रेकनंतर. ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि 1984 च्या उत्तरार्धात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत  415 जागांच्या विक्रमी बहुमताने सत्ता मिळवली.

(हेही वाचा- Lok Sabha Election : गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया भाजपात)

राजीव गांधी यांना दुसरी टर्म मिळाली नाही

राजीव यांना 1989 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग दुसरी टर्म मिळू शकली नाही. जनता दलाचे नेते व्हीपी सिंह भाजप (BJP) आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले. मात्र हे सरकार 11 महिन्यांतच पडले. त्यांच्या जागी काँग्रेसच्या (Congress) बाह्य पाठिंब्याने चंद्रशेखर यांचे सरकार स्थापन झाले, जे चार महिने टिकले. 1991 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे (Congress) पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि काँग्रेसच्या (Congress) विजयानंतर पीव्ही नरसिंह राव 1991 मध्ये पंतप्रधान झाले. मात्र, 1996 च्या निवडणुकीत राव यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.