केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शनिवार, १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या वेळी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत ५४३ ऐवजी ५४४ लोकसभा मतदारसंघांचे नियोजन जाहीर केले. देशात लोकसभेच्या ५४३ जागा आहेत. त्यामुळे हा निवडणूक कार्यक्रम ऐकून एक अतिरिक्त मतदारसंघ निर्माण झाला आहे का, अशी चर्चा होत आहे. याविषयी निवडणूक आयुक्त काय म्हणाले ? (Loksabha Election 2024)
लोकसभेत 543 जागा असतांना 544 मतदारसंघांच्या तारखांची घोषणा झाली. ही एक अतिरिक्त जागा म्हणजे नवा लोकसभा मतदारसंघ तयार झाला नसून मणिपूरमधील हिंसाचारामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – Swami Prasad Maurya यांना ‘ते’ विधान भोवले; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने दिले आदेश)
मणिपूरमध्ये होणार दोनदा मतदान
543 लोकसभा मतदारसंघांसाठी 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत ७ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. प्रत्येक मतदारसंघाला एकाच दिवशी आपला खासदार निवडता येतो, पण एकट्या मणिपूर मतदारसंघात दोन दिवस निवडणुका होणार आहेत. मणिपूरमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एक अंतर्गत लोकसभा मतदारसंघ आहे, तर एक बाह्य मतदारसंघ आहे. यांपैकी अंतर्गत मणिपूरमध्ये 19 एप्रिलला मतदान होईल, तर बाहेरील मणिपूरमध्ये 19 एप्रिल आणि 26 एप्रिल या दोन तारखांना मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने जे मतदार हिंसाचारामुळे (manipur violence) विस्थापित झाले आहेत, त्यांना ते सध्या राहत असलेल्या छावणीतूनच त्यांना करू देण्याची मुभा दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या IDPs साठी अशीच योजना आधीच उपलब्ध आहे. तीच आता मणिपूरमध्येही उपलब्ध होईल, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीचे वेळापत्रक सादर करताना माध्यमांना सांगितले.
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का?)
कोणत्या जिल्ह्यांतील मतदान केव्हा ?
चुराचंदपूर आणि चंदेल हे जिल्हे पहिल्या टप्प्यातील मतदानाचा भाग आहेत. याच दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुकी आणि मैतेई समाजात हिंसाचार झाला होता. बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या 15 विधानसभा मतदारसंघांसाठी19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये हिरोक, वांगजिंग टेंथा, खांगाबोक, वाबगाई, कक्चिंग, हियांगलाम, सुग्नू, चंदेल, सायकुल, कांगपोकपी, सैतू, हेंगलेप, चुराचंदपूर, सायकोट , आणि सिंगत या जागांचा समावेश आहे.
तर बाह्य मणिपूर मतदारसंघातील उर्वरित 13 विधानसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये जिरीबाम, तेंगनौपाल, फुंग्यार, उखरुल, चिंगाई, करोंग, माओ, ताडुबी, तामेई, तामेंगलाँग, नुंगबा, तिपाईमुख, आणि थॅनलॉन या मतदारसंघांचा समावेश आहे. (Loksabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community