आधी प्रभु रामचंद्रांची भक्ती, नंतर अहंकार आला; RSS नेते Indresh Kumar म्हणाले…

ते अहंकारी झाले होते. पक्षाने (BJP) आधी भक्ती केली, त्यानंतर ते अहंकारी झाले. प्रभु रामचंद्रांनी त्यांना 241 वरच रोखले. ज्यांचा प्रभू रामचंद्रांवर विश्वास नव्हता त्यांना 234 वरच थांबवले, असा टोला Indresh Kumar यांनी लगावला.

172
आधी प्रभु रामचंद्रांची भक्ती, नंतर अहंकार आला; RSS नेते Indresh Kumar म्हणाले...
आधी प्रभु रामचंद्रांची भक्ती, नंतर अहंकार आला; RSS नेते Indresh Kumar म्हणाले...

परमेश्वराचा न्याय खरा आणि आनंददायी असतो. जे लोक त्याची उपासना करतात, त्यांनी नम्र रहायला हवे. जे विरोध करतात, परमेश्वर स्वतः त्यांच्याकडे बघतो. निवडणुकीचा निकाल त्यांची (भाजप, BJP) वृत्ती दर्शवतो. ते अहंकारी झाले होते. यामुळेच प्रभु रामचंद्रांनी त्यांना 241 वरच रोखलं, असे खडे बोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी भाजपला सुनावले आहेत. ते जयपूर जवळील कनोता येथे आयोजित ‘रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन समारंभादरम्यान बोलत होते.

(हेही वाचा – Ajit Pawar यांच्या अडचणी वाढणार ?; Shikhar Bank Scam मधील क्लिनचीटला अण्णा हजारे देणार आव्हान)

रामचंद्रांना विरोध करणाऱ्यांना सत्ता नाही

इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, “निवडणुकीचा (Loksabha Election 2024) निकाल त्यांची वृत्ती दिर्शवतो. ते अहंकारी झाले होते. पक्षाने (BJP) आधी भक्ती केली, त्यानंतर ते अहंकारी झाले. प्रभु रामचंद्रांनी त्यांना 241 वरच रोखले. मात्र, सर्वात मोठा पक्ष बनवले. याशिवाय, ज्यांचा प्रभू रामचंद्रांवर विश्वास नव्हता त्यांना 234 वरच थांबवले. रामचंद्रांना विरोध करणाऱ्यांना सत्ता मिळू शकली नाही. ते सर्व मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

प्रभु राम न्यायी होते

“प्रभु रामचंद्र भेदभाव करत नाही अथवा शिक्षाही करत नाहीत. राम कोणाला शोकही करवत नाहीत. ते सर्वांना न्याय देतात. ते देतात आणि देत राहतील. प्रभु राम नेहमीच न्यायी होते आणि राहतील. एवढेच नाही तर, एकीकडे त्यांनी प्रजेचे रक्षणही केले आणि दुसरीकडे रावणाचे भलेही केले”, असेही इंद्रेश कुमार या व्याख्यानात म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.