Lok Sabha Election 2024 : खाकीवर चढतोय खादीचा रंग, पोलीस अधिकाऱ्यांचा राजकारणाकडे कल

पोलीस अधिकारी ते राजकारणी असा प्रवास सुरू करणारे अरुप पटनायक हे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या विश्वासू लोकांमध्ये गणले जातात. २०१९ मध्ये पोलीस दलाच्या निवृत्तीनंतर त्यांनी बीजेडीमधून राजकारणाला सुरुवात केली.

200
Lok Sabha Election 2024 : खाकीवर चढतोय खादीचा रंग, पोलीस अधिकाऱ्यांचा राजकारणाकडे कल

भल्याभल्यांना भुरळ घालणाऱ्या राजकारणाने खाकीवर देखील खादीची छाप पाडला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरून खासदार आणि मंत्री झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर यंदा माजी आयपीएस अधिकारी अरुप पटनायक हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. भाजपा नेते संबित पात्रा यांच्या विरोधात बिजू जनता दलाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

पोलीस अधिकारी ते राजकारणी असा प्रवास सुरू करणारे अरुप पटनायक हे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या विश्वासू लोकांमध्ये गणले जातात. २०१९ मध्ये पोलीस दलाच्या निवृत्तीनंतर त्यांनी बीजेडीमधून राजकारणाला सुरुवात केली. २०१९ मध्ये अरुप यांनी भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता. भाजपाच्या अपराजिता सारंगी यांनी २१ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. सत्यपाल सिंह, अरुप पटनायक हे पोलीस अधिकारी राजकारणात येणारे एकटे नसून यापूर्वी देखील अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी राजकारणात उड्या घेतल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेशिवाय जिंकतील का डॉ. अमोल कोल्हे?)

राज्याचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे देखील पोलीस अधिकारी होते, त्यांनी देखील पोलीस दलातून थेट राजकारणात प्रवेश करून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधानसभेत निवडणुकीत आले होते. २०१९ मध्ये मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राजेश पाडवी यांनी देखील पोलीस दलाचा राजीनामा देऊन शहादा तालुक्यात भाजपाच्या तिकिटावर आमदारकी लढवून निवडून आले. नुकतीच माजी सह पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी निवृत्ती नंतर भाजपात प्रवेश केला असून धुळे जिल्ह्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी देखील २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर वसई तालुक्यातुन आमदारकीची निवडणूक लढवली होती, परंतु या निवडणुकीत शर्माला पराभव स्वीकारावा लागला. माजी पोलीस अधिकारी समशेर पठाण यांनी स्वतःची पार्टी तयार करून राजकारणात प्रवेश केला आहे. नंदूरबारचे माजी पाेलिस अधीक्षक डाॅ. संजय अपरांती यांनी २०१४ मध्ये रायगड लाेकसभा मतदारसंघातून व त्यांनतर २०१९ च्या निवडणूकीत धुळे मतदारसंघातून वंचित बहूजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.