Lok Sabha Elections 2024 : मविआच्या बैठकीत २३ जागांवर एकमत; उर्वरित चर्चा शनिवारी?

211
Lok Sabha Election : काँग्रेसची ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) जागावाटपा संदर्भांत महविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक जरी पार पडली असली व त्यानंतर ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना काहीही दावा केला असला तरी आजही वस्तुतः फक्तं २३ जागांवरच एकमत झाल्याने व प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा ८ जागांची अनपेक्षित मागणी केल्याने कोणताही चर्चा न होता फक्तं आदळापटच जास्त झाल्याने आता शनिवारी ९ तारखेलाच यासंदर्भात अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी खात्रीलायक माहिती मविआ च्याच एका ज्येष्ठ नेत्याने नावं न छापण्याच्या अटीवर बोलताना दिली. (Lok Sabha Elections 2024)
महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या बैठकांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेतृत्व उध्दव ठाकरे व त्यांचे उजवे हात समजले जाणारे खा. संजय राऊत यांनी दोन पावलं मागे घेत समंजस भूमिकाच घेतली. त्यांनी मिञ पक्ष काँग्रेसच्या नेत्यांच्या विनंतीला मान देत हक्काची कोल्हापूर व सांगली या दोन जागाही सोडल्या. मात्र मुंबईच्या पाचही जागा लढवण्यावर ते आजही ठाम आहेत. मात्र जेंव्हा पासून फक्तं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व संजय राऊत यांच्या आग्रहाखातर वंचित बहुजन पक्षाला मविआंत घेतले त्यांनी सुरुवातीपासून अवास्तवच मागण्या बैठकीत केल्या आहेत. पण तरीही केवळ राज्यांत भाजपला दणका देण्यासाठी शरद पवार असोत की, संजय राऊत यांनी कोणताही नवा वाद होवू नये म्हणून त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याप्रती समंजसच भूमिका घेतली. मात्र आजच्या बैठकीत त्यांनी मुंबईतील उत्तर मुंबई व राहूल शेवाळे यांच्या जागेवर दावा केला तेंव्हा मात्र ठाकरे गटाचे संजय राऊत व काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या उपस्थित नेत्यांनी त्याला कडवा विरोध केला. त्यामूळेच आजच्या बैठकीत दोन हक्काच्या जागा गमावल्याने प्रचंड त्रागा केलाच पण दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनीही आता आंबेडकर यांची समजूत काढायची नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने आता पुढील निर्णय शनिवारीच घेण्याचे व त्याच बैठकीत जागावाटपावरही शिक्कामोर्तब करण्याचा निर्धार करत बैठक आटोपती घेतल्याचा ठाम दावाही या नेत्याने यावेळी बोलताना केला. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=fQ5bVkZGTws
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.