Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यातील २६ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक घेणार ‘ही’ सवलत

Lok Sabha Elections 2024 : ८० वर्षांपुढील ज्येष्ठांना घरबसल्या मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे २६ लाखांहून अधिक ज्येष्ठांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

361
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यातील २६ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक घेणार 'ही' सवलत
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यातील २६ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक घेणार 'ही' सवलत

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्देशांनुसार ८० वर्षांपुढील ज्येष्ठांना गेल्या पोटनिवडणुकांपासून घरबसल्या मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे २६ लाखांहून अधिक ज्येष्ठांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. (Lok Sabha Elections 2024)

(हेही वाचा – PM Narendra Modi : घरोघरी जाऊन माझा नमस्कार सांगा; पंतप्रधान मोदींचे राष्ट्रीय अधिवेशनात भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन)

अर्ज १२-ड भरून मिळणार सवलत

त्यातील सर्वाधिक २ लाख ४८ हजार ५२५ मतदार एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. अशा ज्येष्ठांना नमुना अर्ज १२-ड भरून मतदान केंद्रावर न जाता मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदान केंद्रावर येऊन प्रत्यक्ष मतदानाची इच्छा असल्यास अशा नागरिकांना तसेही करता येईल. त्यासाठी मतदान केंद्रांवर (Polling Booths) सहायक नेमण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

२६ लाख ७३ हजार ३९२ नागरिक ८० वर्षांपुढील

राज्यात नुकतीच अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार राज्यात २६ लाख ७३ हजार ३९२ नागरिक ८० वर्षांपुढील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात पुणे जिल्ह्यात २ लाख ४८ हजार ५२५ मतदार आहेत, तर सर्वांत कमी १६ हजार ४२२ मतदार गडचिरोली जिल्ह्यात आहेत. अशा मतदारांना घरून मतदान करण्यासाठी नमुना अर्ज १२-ड भरून मतदान केंद्रावर न जाता मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे अर्ज मतदानाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसांच्या आत करणे अपेक्षित आहे. असे भरलेले अर्ज मतदान कर्मचाऱ्यांद्वारे वितरित आणि गोळा केले जाणार आहेत. (Lok Sabha Elections 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.