Modi 3.0 : पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात ५ अल्पसंख्यांकांना संधी

NDA सरकार प्रामुख्याने चंद्राबाबू नायडू यांची तेलुगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे.

169
Modi 3.0 : पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात ५ अल्पसंख्यांकांना संधी
Modi 3.0 : पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात ५ अल्पसंख्यांकांना संधी

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवार, ९ जून रोजी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या वेळी मोदींच्या मंत्रीमंडळातील एकूण ७२ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. (Modi 3.0) २०२४ मधील हे सरकार प्रामुख्याने चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांची तेलुगू देसम पार्टी यांची आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांचे संयुक्त जनता दल यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या दोन पक्षांनी केंद्र सरकारमध्ये मोठी खाती मागितली आहेत.

(हेही वाचा – Toll collection : Fastag लवकरच होणार रद्दबातल; वाहतूक कोंडीशिवाय होणार टोलवसुली)

मोदींच्या तिसऱ्या मंत्रीमंडळात एकूण सात महिलांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, मोदींच्या या तिसऱ्या मंत्रीमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही. तसेच या मंत्रीमंडळात केवळ पाच इतर अल्पसंख्यांक चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

कोण आहेत ते ५ मंत्री

मोदी कॅबिनेट ३.० (Modi 3.0) मध्ये एकूण ७२ मंत्री आहेत. या मंत्रीमंडळात रवनीतसिंग बिट्टू (शीख) (Ravneet Singh), हरदीपसिंग पुरी (शीख) (Hardeep Singh Puri), जॉर्ज कुरियन (ख्रिश्चन) (George Kurien), किरेन रिजिजू (बौद्ध) (Kiren Rijiju) आणि रामदास आठवले (बौद्ध) (Athawale Ramdas) या पाच अल्पसंख्यांक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

रामदास आठवले हे मोदींच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. किरेन रिजिजू हे मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते, तर दुसऱ्या मंत्रिमंडळात कायदा आणि न्यायमंत्री (कॅबिनेट) होते. जॉर्ज कुरियन हे केरळमधील भाजपाचा मोठा चेहरा मानले जातात. कुरियन ना लोकसभा निवडणूक जिंकले आहेत, ना त्यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. तरीदेखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. भाजपा लवकरच त्यांना राज्यसभेवर घेऊ शकते. ते यापूर्वी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष होते. हरदीपसिंग पुरी हे मोदींच्या दुसऱ्या मंत्रीमंडळात पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस विभागाचे मंत्री होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.