सांगलीचे (Sangali) नाराज काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काँग्रेसने सांगली (Sangali) जागेवरील आपला हक्क सोडून दिला, त्यामुळे ही जागा आता शिवसेना उबाठा गट लढवणार आहे. उबाठाने सांगली (Sangali) मतदार संघासाठी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा याआधीच केली असून गेले काही दिवस काँग्रेस विरुद्ध उबाठा असा शाब्दिक संघर्ष पाहावयास मिळत आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते विशाल पाटील (Vishal Patil) हे बंडाच्या तयारीत असल्याचे समजते. मात्र शेवटचा पर्याय म्हणून पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीशी बोलणी सुरू केल्याचे समजते.
वंचितची ‘ऑफर’
प्रकाश आंबेडकर यांनीही विशाल पाटील (Vishal Patil) यांची भेट झाल्याचे स्पष्ट केले असून आंबेडकर यांनी पाटील यांना वंचितकडून निवडणूक लढवण्यासाठी ‘ऑफर’ केल्याचे कळते. ही ऑफर पाटील स्वीकारतात की अपक्ष म्हणून निवडणूक लढतात हे लवकरच कळेल.
(हेही वाचा – ISRO: इस्रोचे पुढचे लक्ष्य चांद्रयान -४ मोहिमेवर केंद्रित, एस. सोमनाथ यांची माहिती)
उबाठाची हुकुमशाही
येत्या १-२ दिवसात काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी पुढील भूमिकेबद्दल कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. एकीकडे हुकुमशाहीविरुद्ध लढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेना उबाठाकडून काँग्रेस पक्षावर हुकुमशाही गाजवत काँग्रेसची हक्काची जागा खेचून घेण्याची कृती करण्यात येत असल्याची भावना एका काँग्रेस कार्यकर्त्याने व्यक्त केली.
काँग्रेस हायकमांड उबाठाच्या दबावाखाली
गेले महिनाभर विश्वजीत कदम यांनी सातत्याने सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा करून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी मिळावी, यासाठी राज्यात आणि दिल्लीत प्रयत्न केले. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद न देता काँग्रेस हायकमांड शिवसेना उबाठाच्या दबावाखाली आली आणि ही जागा सोडली, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. या मतदार संघात शिवसेना उबाठाची ताकद नसताना उबाठाकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आणि आता ही जागा त्यांनी प्रतिष्ठेची केली.
(हेही वाचा – MNS : राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसेला कोणी केला अखेरचा जय महाराष्ट्र ?)
उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देणे टाळले
मंगळवारी ९ एप्रिलला महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगलीची (Sangali) जागा शिवसेना उबाठा लढणार असल्याचे काँग्रेस नेत्यांसामोर सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी यावर बोलणे टाळले. इतकेच नव्हे तर उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना, काँग्रेस कार्यकर्ते उबाठाला सहकार्य करतील का? या प्रश्नावर उत्तर देणे टाळले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community