संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकसभेत धक्कादायक अशी एक घटना घडली आहे. संसदेच्या प्रेक्षक गॅलरीमधून दोघांनी उडी मारली. यावेळी त्यांनी काही घोषणा दिल्या. त्यामुळे संसदेच्या सुरक्षेसंदर्भात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातील एकाचे नाव हे अमोल शिंदे असून तो महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. (Parliament Security Breach )
या घटनेत दोन तरुण व एका तरुणीचा समावेश आहे. अमोल शिंदे या आंदोलकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याने म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या नावाने पास बनविल्याची माहिती समोर आली आहे. घुसखोरांपैकी दुसऱ्याचे नाव सागर असे सांगितले जात आहे. तर तिसरी तरुणी निलम सिंग आहे. ती हरियाणामधील रहिवासी आहे. यातील सागर हा सभागृहात गेला होता. (Parliament Security Breach )
(हेही वाचा : Lok Sabha Intrusion : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक)
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाली आणि याच दिवशी संसदेत तरुणांनी घुसखोरी करून खासदारांच्या बाकावर उडी मारल्याने संसदेत गोंधळ उडाला. त्यामुळे काहीवेळ संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणा या घटनेचा कसून तपास करत आहेत.
हेही पहा –