पुणे विद्यापीठाचा मनमानी कारभार, घरातील किरकोळ वस्तूंसाठी लाखो रुपयांचा खर्च

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मनमानी कारभार समोर आला आहे. विद्यापीठ परिसरात असणा-या कुलगुरुंच्या बंगल्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या हाती या खर्चाची बिलं लागली असून, कुलगुरुंच्या बंगल्याच्या रंगरंगोटीसाठी आणि घरातील दैनंदिन वापरातील वस्तू खरेदी करण्यासाठी हा खर्च करण्यात आल्याचा खुलासा या वृत्तवाहिनीने केला आहे.

पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असून, ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट अशी पुणे विद्यापीठाची ख्याती आहे. देशभरातून या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. त्यामुळे पुणे विद्यापीठाकडे एक नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून पाहिले जाते. पण सध्या कुलगुरू पदाची जबाबदारी सांभाळणा-या डॉ.कारभारी काळे यांच्या काळात विद्यापीठात वायफळ खर्च होत असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः ‘काही माणसं ढळली, पण खरे ‘अढळ’ माझ्यासोबत’, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव अढळरावांना टोला)

दीड लाखाची भांडीकुंडी

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या निवृत्तीनंतर डॉ.कारभारी काळे हे पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू झाले. काही दिवसांसाठी काळे हे विद्यापीठातील विश्रामगृहात राहत असताना विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांना लागणा-या भांड्याकुंड्यांवर तब्बल दीड लाख रुपयांचा खर्च केला. तसेच महागडे बेडशीट आणि उशांसाठी तब्बल 99 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे घरात लागणा-या किरकोळ वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, वृत्तवाहिनीला या खर्चाची बिलं देखील मिळाली आहेत.

या वस्तूंवर अमाप खर्च

कप-बशी सेट,चहा कप बॉक्स,कॉफी मग बॉक्स,टिफिन,किटली,चॉपिंग बोर्ड,कुकर,कुकर पॉट,कॉफी शुगर सेट,दूध पिशवी,सिझलर तडका पॅन,तांब्या-फुलपात्र,सँडविच मेकर,सर्किंग सेट,सेलो बरण्या,काचेच्या बरण्या,स्टीलच्या वाट्या,स्टील प्लेट्स,प्लेट ग्लास,टिश्यू पेपर यांसारख्या 92 वस्तूंच्या खरेदीसाठी जीएसटीसह तब्बल 1 लाख 49 हजार 471 रुपये विद्यापीठ प्रशासनाने खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here