लव्ह जिहाद : भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजनबद्ध षडयंत्र!

‘लव्ह जिहाद’ हा शब्द मागील काही वर्षांत इतका प्रचलित झाला आहे की, तो जवळजवळ सर्वश्रुत झाला आहे. राज्यघटनेच्या कलम २५ नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या मर्जीने कोणताही धर्म स्वीकारण्याची मुभा मिळालेली आहे. असे असले, तरी हिंदूंचे अस्तित्व नियोजनबद्ध संपवण्याचा कट ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून चालू आहे. ‘लव्ह जिहाद’मुळे हिंदू आणि मुसलमानेतर अन्य धर्मीय लाखो मुलींची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत. हे संकट वेळीच रोखले गेले नाही, तर हा विषारी अजगर केवळ हिंदूंनाच नव्हे, तर भारतालाही गिळंकृत केल्याविना रहाणार नाही. ‘लव्ह जिहाद’चा हा धोका लक्षात घेऊन हिंदूंनी वेळीच जागृत व्हावे आणि केंद्र शासनाला या विरोधात कठोर पाऊले उचलण्याची आग्रही मागणी करावी.

काय आहे लव्ह जिहाद?

लव्ह आणि जिहाद या अनुक्रमे इंग्रजी आणि अरबी शब्दांपासून ‘लव्ह जिहाद’ हा शब्द बनला आहे. लव्ह म्हणजे प्रेम. हे प्रेम जिहादचा हेतू साध्य करण्यासाठी असल्याने ते फसवे असते. जिहाद म्हणजे सर्व जगावर इस्लामी राज्य प्रस्थापित करण्यासाठी इस्लाम धर्म न मानणाऱ्यांविरुद्ध ्पुकारण्यात आलेले युद्ध. त्यामुळे ‘लव्ह जिहाद म्हणजे जिहादी विचारसरणी असणाऱ्यांनी फसव्या प्रेमाच्या माध्यमातून हिंदु आणि ख्रिस्ती’ समाजांविरुद्ध पुकारलेले युद्ध, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल.

(हेही वाचा हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’?)

लव्ह जिहादची प्रेरणा देणाऱ्या चित्रपटांमागे पाकची गुप्तचर संस्था

भारतीय समाजावर चित्रपटांचा असलेला प्रभाव हेरून पाकची गुप्तचर संस्था आयएसआयने लव्ह जिहादला अनुकूल वातावरणनिर्मिती करण्यासाठी १९९० पासून गुन्हे जगताचा माफिया दाऊद इब्राहीमच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत पैसा गुंतवण्यास आरंभ केला. या मंडळींनी चित्रपट निर्मात्यांना मुसलमान नायक आणि हिंदु नायिका अशी जोडी असलेले चित्रपट निर्माण करण्यास भाग पाडले. अशा चित्रपटांत मुसलमान नायकांसमवेत हिंदु नायिकांची प्रणयदृश्ये जाणीवपूर्वक दाखवून हिंदु तरुणींच्या मनात अनैतिक प्रेमभावना जागवल्या जातात. त्यामुळे मोठ्या पडद्यावर दिसणारा मुसलमान नायक आपल्याच परिसरातील मुसलमान युवकात शोधण्याचा प्रयत्न हिंदू तरुणी करतात. आता हिंदु तरुणींना मुसलमानांशी प्रेमाचे चाळे करण्यात किंवा त्यांच्याशी विवाह करण्यात काहीच गैर वाटत नाही. याउलट चित्रपटात हिंदु नायक आणि मुसलमान नायिका यांचे प्रेम, असा विषय असल्यास ते मुसलमानांना खटकते आणि ते त्या चित्रपटाला संघटितपणे विरोध करतात. बाँबे चित्रपटाच्या वेळी असे घडले होते.

कशासाठी चालतो लव्ह जिहाद !

हिंदु तरुणींचे इस्लामीकरण करून हिंदु वंशवृद्धीचा एक स्रोत नष्ट करणे, हिंदु तरुणींशी विवाह केल्यानंतर अनेक अपत्ये जन्माला घालून इस्लामी वंशवृद्धी करणे, विवाहानंतर हिंदु तरुणींचा जिहादी कारवाया आणि शस्त्रास्त्र-तस्करी यांसाठी वापर करणे, विवाहानंतर अनेक अपत्ये जन्माला घालून त्यांचा आत्मघातकी पथकांसाठी वापर करणे या सर्वांचा अंतिम उद्देश ‘जगाचे इस्लामीकरण करणे’, हाच आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल.

हिंदु मुलींना बाटवा, प्रतिदिन २०० रुपये मिळवा’, असा फतवा!

संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मौलवींकडून लव्ह जिहादसाठी प्रतिदिन २०० रुपये घ्या आणि हिंदु मुलींना बाटवा, असा फतवा काढण्यात आला आहे. त्यानुसार हिंदु मुलींना पटवण्यासाठी मुलांना प्रतिदिन २०० रुपये देण्यात येतात.
हिंदु मुलीला पटवल्यावर त्यांना एक दुचाकी वाहन आणि तिच्याशी निकाह (लग्न) केल्यावर एक-दोन लाख रुपये दिले जातात. याविषयीचे वृत्त २२ फेब्रुवारी २००९ च्या दैनिक तरुण भारतच्या सोलापूर आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झाले होते. दैनिक सामनामध्ये हे वृत्त आले होते.

(हेही वाचा इस्लामी अर्थव्यवस्थेसाठी ‘हलाल’ चा विस्तार!)

‘लव्ह जिहाद’साठी अरब राष्ट्रांतून पैशांचा पुरवठा!

केरळमधील वृत्तपत्रांच्या मते लव्ह जिहादसाठी अरब राष्ट्रांतून पैसा पाठवला जातो. दमाम (सौदी अरेबिया) येथे असलेली इंडियन कॅटीर्निटी फोरम ही संस्था याच कारणासाठी पैसा गोळा करते. लव्ह जिहादसाठी सौदी अरेबिया येथून वेस्टर्न युनिअन मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून हवालाद्वारे पैसा येतो. भारतातील काही दागिन्यांच्या व्यावसायिकांच्या आखाती राष्ट्रांमध्ये शाखा आहेत. त्यांच्याद्वारेही पैशांचे स्थलांतर केले जाते. हज यात्रेसाठी जाणार्‍या मुसलमान यात्रेकरूंच्या माध्यमातूनही पैशांचे स्थलांतर होते; कारण हज येथून येणार्‍या विमानांतील प्रवाशांची कडक पडताळणी होत नाही. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेने १९९६ पासून लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदुस्थानात कार्य करण्यास प्रारंभ केला. लष्कर-ए-तोयबाकडून लव्ह जिहादसाठी मुसलमान तरुणांना मोठ्या प्रमाणावर पैसा, अत्याधुनिक साधनसुविधा आणि नियोजनबद्ध आराखडे पुरवले जात आहेत.

हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी का पडतात?

  • हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडतात, याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांना इस्लामी आक्रमकांनी १,३०० वर्षे हिंदुस्थानवर केलेले अत्याचार आणि त्या पंथाची जिहादी विचारसरणी यांचे ज्ञान नसते, हे होय. हिंदु मुलींना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसणे, हेही त्या लव्ह जिहादला बळी पडण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. अशा मुलींकडून धर्मपालन केले जात नसल्याने त्यांच्यात हिंदु धर्माविषयी अभिमान नसतो आणि म्हणूनच त्या परधर्मात जाण्यास सिद्ध होतात.
  • हिंदु मुलींना हिंदु धर्माचे महत्त्व नसणे, हेही त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. अशा मुलींकडून धर्मपालन केले जात नसल्याने त्यांच्यात हिंदु धर्माविषयी अभिमान नसतो. त्यामुळे त्या परधर्मात जाण्यास तयार होतात. पालकांकडून दिले जाणारे अनिर्बंध स्वातंत्र्य आणि त्यांना पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यास दिली जाणारी मुभा. तसेच आधुनिक विचारांचा आत्मघातकी अभिमानही मुलींना संस्कारापासून दूर नेतो.
  • एका सर्वेक्षणानुसार एकट्या किंवा अलीप्त रहाणाऱ्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्या मुलींना भावनिक आधार मिळत नाही, त्या मुली तो आधार बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मुलीला तिच्या डोक्यावर हात फिरवून आस्थेने चौकशी करणारे आणि तिचे बोलणे ऐकणारे पालक हवे असतात.

(हेही वाचा केवळ याकूब मेमनच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ गड-किल्ल्यांवरही कबरी उभारल्यात!)

हिंदूंनी काय धोरण ठेवावे?

  • वयात येण्याच्या काळात मुलीत शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या काळात तिला प्रेमाने वागवा. तिच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण करा. दररोज मुलीशी थोडा वेळ अनौपचारिक संवाद साधून तिच्या मनातील जाणा आणि तिने सहज संवाद साधावा, असे कौटुंबिक वातावरण निर्माण करा.
  • एका हिंदु घरातील मुलगी परधर्मियाने पळवून नेल्यावर ‘आपल्या घरातील मुलीबाळी तर सुरक्षित आहेत ना ? मग कशाला विचार करायचा ?’ अशी आत्मघातकी वृत्ती हिंदूंनी सोडून द्यावी. धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवणारे हिंदू याकडे दुर्लक्ष करतात; मात्र हे संकट स्वत:च्या घरात आल्यास त्यांना त्याची जाणीव होईल. पळवून नेलेल्या मुलीला पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे धाडस बरेचवेळा हिंदू दाखवत नाहीत, यामुळेच धर्मांधांचे फावते. ‘पोरगी माझ्यासाठी मेली’, असे म्हणून हात झटकून आपल्या दैंनदिन कामकाजात व्यस्त रहाणे, यात कोणताही पुरुषार्थ नाही.
  • धर्मशिक्षणाचा अभाव आणि हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे यांमुळे हिंदु मुली धर्मांतरित होतात, यासाठी – लहानपणापासून मुलीवर हिंदु धर्मातील कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नीतीमूल्यांचे संस्कार करायला हवेत.
  • हिंदु कुटुंबात आणि हिंदुस्थानात जन्म झाल्याचा अभिमान मुलीमध्ये जागवा. हिंदु सभ्यतेला साजेल, अशी वेशभूषा परिधान करण्याची आवड मुलीमध्ये निर्माण करा. धर्मसत्संग, राष्ट्रपुरुषांविषयीचे कार्यक्रम आदी उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी मुलीला प्रोत्साहन द्या.
  • हिंदु संस्कृती, हिंदु धर्मातील ग्रंथ, हिंदु धर्माचा इतिहास, हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आदी गोष्टींचे महत्त्व मुलीला समजावून सांगा. मुलीला केवळ हिंदु धर्माची महती सांगितल्याने धर्मांतरे थांबणार नाहीत. ती थोपवण्यासाठी लव्ह जिहादच्या धोक्याची ओळख मुलीला करून द्या.
  • अनेकदा धर्मांतरित असहाय्य मुली परत येण्यास सिद्ध असूनही त्यांना हिंदु समाज स्वीकारत नाही. धर्माविरुद्ध बंड करून हिंदु मुलगी परत घरापर्यंत पोहोचली, यातच तिने तिचा हिंदु अंश दाखवला असल्याने तिला हिंदु समाजाने निःसंकोचपणे स्वधर्मात पुनर्प्रवेश देऊन धर्मांधांवर दडपण आणायला हवे.
  • आमच्यातील हिंदु युवकांनी अशा पीडित मुलींशी विवाह करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. तसेच त्यांच्या नव्या संसाराचे दायित्व आर्थिकदृष्ट्या सक्षम हिंदूंनी घेतले पाहिजे. जिहादी मानसिकतेचे तरुण हिंदु तरुणींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्यावर वारंवार बलात्कार करतात. एकदा शील भ्रष्ट झाले, तर ते पुन्हा मिळवता येत नाही आणि स्त्रीच्या जीवनात शिलापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट कुठलीही नाही. अल्लाउद्दीन खिलजीसारख्या जिहाद्यांपासून स्वत:चे शील रक्षिण्यासाठी संपूर्ण शरीरच अग्नीच्या स्वाधीन करणार्‍या रजपूत स्त्रिया याच आपल्या आदर्श आहेत.

लेखिका – प्रियांका लोणी, समन्वयक ‘रणरागिणी’.

(हेही वाचा याआधी शिवसेनेची दसरा मेळाव्याची ‘तोफ’ शिवाजी पार्कमध्ये कितीवेळा थंडावलेली?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here