उज्जैनमध्ये लव्ह जिहादच्या प्रकरणात हिंदू (Hindu) संघटनांनी एका कट्टरपंथी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी सैफ अहमदला एका रिक्षाचालकाने बनावट आधारकार्ड बनवून दिले होते. ज्याचा सैफ अहमदने (Saif Ahmed) गैरवापर केला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. (Love Jihad)ठ
( हेही वाचा : Santosh Deshmukh Murder : देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यात जातीयद्वेष पसरवण्याचा प्रयत्न)
याप्रकरणी सीएसपी ओपी मिश्रा (OP Mishra) म्हणाले की, हिंदूत्ववादी संघटनांनी महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकलव्य हॉटेलमध्ये एका तरुणाला पकडले. या कट्टरपंथी तरुणाने आपली खरी ओळख लपवून भाड्याने खोली घेतली होती. हिंदुत्ववादी संघटनांना संबंधित कट्टरपंथी तरुणाच्या कारवायांची माहिती होती. त्या आधारे त्यांनी हॉटेलवर धाड घातली. संबंधित तरुणाने प्रकाश कुमार गुप्ता नावाने खोली बुक केली होती. सैफ अहमद असे मूळ नाव असून तो छत्तीसगड जिल्ह्यातील भिलाई येथील रहिवासी आहे. त्यावेळी तरुणासोबत एक हिंदू (Hindu) तरुणीही हॉटेलच्या रुममध्ये होती. त्यामुळे ओळख लपवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवल्याने लव्ह जिहाद असल्याचे हिंदू (Hindu) संघटनांनी सांगितले. (Love Jihad)
दरम्यान संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीनंतर सैफने बनावट कागदपत्र वापरल्याचे उघड झाले. सैफला हे बनावट कागदपत्र एका रिक्षाचालकाने तयार करून दिले होते. त्यामुळे पोलिस याप्रकरणी रिक्षाचालकाचाही शोध घेत आहेत. तसेच बनावट ओळखपत्राच्या आधारे खोली भाड्याने का देण्यात आली? असा सवाही हिंदू संघटनांनी हॉटेल व्यवस्थापनाकडे केला आहे.
याप्रकरणी अर्जुनसिंह चौहन यांनी सांगितले की, संघटनेला मिळालेल्या माहितीनुसार महाकाल पोलीस ठाणे परिसरात एक तरुण खोली मिळवण्यासाठी फिरत आहे. संस्थेच्या सदस्यांनी त्याचा पाठलाग करत व्हिडिओही बनवला आहे. दरम्यान काही वेळानंतर हिंदुत्ववादी संघटनेचे लोक घटनास्थळी आले आणि त्यांनी संपूर्ण प्रकरण उघड केले. सैफने कबूल केले की, रिक्षाचालकाने फेक अकाऊंट दिले होते. लव्ह जिहादप्रकरणी पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.(Love Jihad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community