लव्ह जिहाद : हिंदूंची वंशवृद्धी थांबवण्याचे कारस्थान!

135

लव्ह जिहादच्या विषयाला सुरुवात करण्याअगोदर एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया की, लव्ह जिहादच्या षडयंत्राला विरोध म्हणजे राष्ट्रभक्त एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांना विरोध असे नाही. कारण धर्मनिरपेक्ष हिंदू हे लव्ह जिहादचा अर्थ ‘आंतरधर्मीय लव्ह मॅरेज’ असा घेत आहेत. लव्ह जिहादी षडयंत्र करून हिंदू मुलींचे आयुष्य बरबाद करत आहेत. तरी काही निद्रीस्त हिंदूंना या लव्ह जिहादच्या भयानक विषयाचे सत्य अजूनपर्यंत पटलेले नाही. हिंदू बांधवांनो, आपला भारत देश भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतो आणि याच संविधानानुसार भारतातल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात यांसारख्या राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात आहे. भारतीय संविधानातील तरतुदींना अनुसरून या राज्यातील कायदे बनविण्यात आलेले असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे लव्ह जिहाद विरोधी कायदे अबाधित ठेवले आहेत. त्यामुळे हिंदू बांधवांनो, लव्ह जिहादचे षडयंत्र हे थोतांड नाही, ती एक कटू वास्तविकता आहे. हिंदूंच्या गाईपेक्षा आज हिंदूंची माई धोक्यात आली आहे.

(हेही वाचा हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’?)

जिहादी मुस्लिम तरुणाच्या जाळ्यात अडकल्यावर काय होते?

गेल्या १४ ते १५ वर्षांपूर्वीपासून भारतामध्ये लव्ह जिहादचा शिरकाव झाला. या षडयंत्रामध्ये मुस्लिम लव्ह जिहादी मुलगा हिंदू युवतीला स्वत:चे हिंदू नाव सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो. हिंदू युवतीच्या शाळेत, कॉलेजात, घरापर्यंत पाठलाग करून प्रेम जाळ्यात अडकवण्यास तिला मजबूर करतो. त्यानंतर तो लव्ह जिहादी हिंदू मुलीशी लग्नाचा डाव रचतो. काही कालावधी झाल्यानंतर तिला धर्म बदलायला सांगून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडतो. अनेक प्रकरणात हिंदू मुलींना बळजबरीने गोमांस खाऊ घातलेले आहे, धर्म बदलल्यावर नाव बदलले आहे, बुरखा घालायला भाग पाडले आहे. याचा अर्थ असा की, लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्या मुलीला हिंदू धर्माचे पालन करू दिले जात नाही. ती रामायण, महाभारत, शिवचरित्र, शंभूचरित्र इत्यादी वाचू शकत नाही. हिंदू सण साजरे करू शकत नाही. ती फक्त मुले जन्माला घालणारी मशीन बनते आणि तिची मुले देखील हिंदू राहत नाहीत. पुढे हा लव्ह जिहादी अजून बायका करून आणतो. हिंदू मुलीला त्याच्या संपत्तीत देखील हिस्सा मिळत नाही. उलट या लव्ह जिहादीकडून हिंदू मुलीच्या बापाकडून पैसे उकळण्याचेही प्रकार घडले आहेत. लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदू मुलींना फक्त आणि फक्त नरकातील यातना पूर्ण आयुष्यभर भोगाव्या लागतात. काही मुलींना तर वेश्या व्यवसायाला देखील सामोरे जावे लागले आहे. या जाळ्यात अडकलेल्या हिंदू पीडित मुलींचे व्हिडिओ देखील युट्युबवर समोर आले आहेत.

(हेही वाचा इस्लामी अर्थव्यवस्थेसाठी ‘हलाल’ चा विस्तार!)

मुलींना हिंदू धर्माचरण शिकवा

आपल्या परिवारातील मुलगी लव्ह जिहादी षडयंत्राची बळी ठरू नये, असे जर हिंदूंना वाटत असेल, तर हिंदू धर्म पालनाची शिकवण आपल्या मुला-मुलींना देणे अत्यंत गरजेचे आहे. रामायण, महाभारत, शिवभारत यांचा वारसा जपणारी मुलगी कधीच या जाळ्यात अडकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या अठरापगड जातीच्या मावळ्यांनी आपल्या घरातील मुलगी कधीच बादशाह वा सुलतानाच्या घरात दिली नाही. किंबहुना राजर्षी शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी देखील असे कधीच केले नाही. आपण जर या सर्वांना हृदयापासून आदर्श मानत असू तर आपण देखील असे कृत्य करता कामा नये. याची खबरदारी आपण शिवछत्रपतींचा आजच्या युगातला एक मावळा म्हणून घेतली पाहिजे.

(हेही वाचा केवळ याकूब मेमनच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ गड-किल्ल्यांवरही कबरी उभारल्यात!)

कायदा व्हावा यासाठी ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’चे प्रयत्न चालू

लव्ह जिहादच्या विरोधात ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’च्या माध्यमातून लव्ह जिहादविरोधी, बिगर राजकीय मोर्चा ९ ऑगस्ट २०२१ रोजी श्रीरामपूर शहरात हजारोंच्या उपस्थितीत काढण्यात आला. तसेच दुसरा मोर्चा देखील १ सप्टेंबर २०२२ रोजी श्रीरामपुरात निघाला. ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’ संघटनेचे अठरापगड जातीचे मावळे लव्ह जिहादच्या षडयंत्राला स्पष्टपणे विरोध करीत आहेत. किमान १०० पेक्षा जास्त अठरापगड जातीच्या हिंदू मुलींना या लव्ह जिहादच्या जाळ्यातून ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’ने बाहेर काढले आहे. तसेच लव्ह जिहाद विरोधात महाराष्ट्रात देखील कायदा व्हावा यासाठी ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’चे प्रयत्न चालू आहेत. लव्ह जिहादला रोखण्यासाठी इतर अनेक वैधानिक मार्ग आहेत. परंतु तो हिंदू समाजाच्या अब्रू रक्षण कार्याचा गुप्त भाग असल्यामुळे येथे मांडता येणार नाही.

लेखक – चंद्रशेखर आगे, कार्याध्यक्ष, शिवप्रहार प्रतिष्ठान.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.