LPG Cylinder मिळणार अवघ्या ६०० रुपयांत

118

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत, अशा वेळी मोदी सरकारने महिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्राने आता एलपीजीवरील LPG Cylinder अनुदानात वाढ केली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील लाभार्थीना आता २०० रुपये ऐवजी ३०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याआधी रक्षाबंधन आणि ओमनच्या निमित्ताने सिलिंडरसाठी २०० रुपये अनुदान जाहीर केले होते.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर LPG Cylinder 200 रुपयांनी कमी केले होते. ही किंमत 1100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत कमी झाली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस मिळू लागला. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या भगिनींना आता 300 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर LPG Cylinder मिळणार असल्याचे मंत्री ठाकूर यांनी सांगितले. दिल्लीतील उज्ज्वला लाभार्थींना सध्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरसाठी 703 रुपये देतात, तर त्याची बाजारात सामान्य नागरिकांसाठी एलपीजी गॅस सिलिंडरसाठी 903 रुपये मोजावे लागतात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यांना 603 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे.

(हेही वाचा Bombay High Court : नांदेड जिल्हा मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली स्वतःहून दखल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.