‘छावा’ चित्रपटामुळे Swara Bhaskar चा तिळपापड; म्हणते, 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होणारा समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय

चित्रपट पाहायला आलेले लाखो प्रेक्षक भावुक होत आहेत, डोळे पाण्याने भरून चित्रपटगृहाबाहेर पडत आहेत. या लाखो हिंदूंच्या भावनांचा स्वरा भास्करने (Swara Bhaskar) अवमान केला आहे.

379
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट सर्वत्र गाजत आहे. मोठ्या संख्येने हिंदू प्रेक्षक चित्रपट पहायला जात आहेत. मात्र यामुळे हिंदुद्वेषी आणि मुसलमान बनलेली धर्मांध वृत्तीची स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हीचा तिळपापड झाला आहे. त्या रागाने तिने एक वादग्रस्त पोस्ट X वर केली आहे.

स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या या खोडसाळ पोस्टने ती चांगलीच ट्रॉल होत आहे.

छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रम आणि त्यांचा मुघलांकडून झालेल्या अनन्वित छळ दाखवण्यात आला आहे.  या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींची कमाई देखील केली आहे. अनेकांनी (Chhaava) या सिनेमाचे कौतुक केले आहे. त्याच वेळी आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने या सिनेमाबाबत पोस्ट करताना हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

काय म्हणाली स्वरा भास्कर? 

चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयावह मृत्यू झालेत. पण ते सोडून चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील किंवा संताप व्यक्त करत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय. गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झाले. त्यांचे मृतदेह बुलडोझरद्वारे काढावे लागले. यावर चिंता न व्यक्त करता समाज 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत आहे, संताप व्यक्त करत आहे, असे स्वरा भास्करने  (Swara Bhaskar) म्हटले आहे.
या चित्रपटाच्या शेवटच्या ३० मिनिटांच्या भागात छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर क्रूरकर्मा औरंगजेबाने अनन्वित अत्याचार कसे केले, याचे थरारक दृश्य दाखवण्यात आली आहेत, ही दृश्ये पाहून चित्रपट पाहायला आलेले लाखो प्रेक्षक भावुक होत आहेत, डोळे पाण्याने भरून चित्रपटगृहाबाहेर पडत आहेत. या लाखो हिंदूंच्या भावनांचा स्वरा भास्करने  (Swara Bhaskar) अवमान केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.