Madha Loksabha Election: माढ्यात महायुतीला धक्का; संजय कोकोटे यांचा शरद पवार यांच्या गटात प्रवेश

185
Madha Loksabha Election: माढ्यात महायुतीला धक्का; संजय कोकोटे यांचा शरद पवार यांच्या गटात प्रवेश
Madha Loksabha Election: माढ्यात महायुतीला धक्का; संजय कोकोटे यांचा शरद पवार यांच्या गटात प्रवेश

शिवसेनेचे माढा लोकसभा (Madha Loksabha Election) मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकोटे (Sanjay Kokote) यांनी शिवसेनेला राम राम करत शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. (Madha Loksabha Election) महायुतीसाठी हा धक्का समजला जात आहे. भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Nimbalkar) पुन्हा उमेदवारी दिल्याने संजय कोकोटे (Sanjay Kokote) शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. (Madha Loksabha Election)

(हेही वाचा – Ramtek Lok Sabha : रामटेकमध्ये काँग्रेसच्या अडचणी संपता संपेना; किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा)

शुक्रवारी (५ एप्रिल) मुंबईत संजय कोकाटे (Sanjay Kokote) यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील पवार गटात प्रवेश केला. दरम्यान रणजितसिंह निंबाळकरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानं संजय कोकाटे (Sanjay Kokote) नाराज होते. अखेर त्यांनी शिवसेना सोडत पवार गटात प्रवेश केला. (Madha Loksabha Election)

(हेही वाचा – PM Modi :काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप ; पंतप्रधान मोदींचा घणाघात)

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी संजय कोकाटे (Sanjay Kokote) यांचे पक्षात स्वागत केले. तुम्ही जर पक्ष संघटना बळकट केली तर तुमच्याशिवाय तिथं कोणी नाही असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. तुम्ही जर बुथ लेवलपर्यंत संघटना बळकट केली तर तुमचाच सुर्य तुतारीच्या निनादाने उगवेल. माढा लोकसभा मतदारसंघात आता तुतारीच वाजणार असल्याचे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. (Madha Loksabha Election)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.