महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ५ जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्याने प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीत भाजपाकडून पाचपैकी तीन जागांवर उमेदवार देण्यात येणार आहे. त्यामध्ये माधव भांडारी (Madhav Bhandari) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
(हेही वाचा Holi साठी अनधिकृत वृक्षतोड केल्यास थेट जेलमध्ये जावे लागणार)
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी एक उमेदवार दिला जाणार असल्याचे समजते. भाजपाकडून या निवडणुकीत उमेदवारांबाबत धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी (Madhav Bhandari) यांच्यासह दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर यांची नावे प्रदेश पातळीवरून केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community