Madhavi Lata: ओवेसींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माधवी लता यांना Y+ सुरक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय

263
Madhavi Lata: ओवेसींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माधवी लता यांना Y+ सुरक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय
Madhavi Lata: ओवेसींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माधवी लता यांना Y+ सुरक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Madhavi Lata) भाजपने काही दिवसांपूर्वी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. १९५ उमेदवारांच्या त्या यादीत २८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या यादीतील एक नाव आहे माधवी लता. (Madhavi Lata) रा. स्व. संघाशी असलेली जवळीक त्यामुळे त्या ‘संघाची कन्या’ (Madhavi Lata) म्हणून ओळखल्या जातात. शिवाय, पारंपरिक भारतीय महिला, उद्योजक, रुग्णालय प्रशासक व प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना अशीही त्यांची ओळख आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या विरोधात भाजपाने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. (Madhavi Lata)

(हेही वाचा –Amritpal Singh: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या आईला अटक; वाचा संपूर्ण प्रकरण)

वाय प्लस सुरक्षा म्हणजे काय?

माधवी लता (Madhavi Lata) हैदराबादमधून असुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्याविरोधात निवडणुक लढवत आहेत. माधवी लता यांना गृह मंत्रालयाने वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा दिली आहे. आयबीच्या धमकीच्या अहवालाच्या आधारे गृह मंत्रालयाने माधवी लता (Madhavi Lata) यांना सुरक्षा दिली आहे. वाय प्लस कॅटेगिरीमध्ये सशस्त्र पोलिसांचे ११ कमांडो तैनात असतात. त्यापैकी पाच सॅस्टिक पोलिस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी व्हीआयपींच्या घरात आणि आसपास राहतात. तसेच, सहा पीएसओ संबंधित व्हीआयपींना तीन शिफ्टमध्ये सुरक्षा देतात. (Madhavi Lata)

(हेही वाचा –Amritpal Singh: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या आईला अटक; वाचा संपूर्ण प्रकरण)

ओवेसींच्या विरोधात माधवी लता यांना उमेदवारी

हैदराबाद हा (AIMIM) एआयएमआयएमचा (Asaduddin Owaisi) बालेकिल्ला मानला जातो. १९८४ पासुन इथे ओवेसी कुटुंबाचे वर्चस्व आहे. असदुद्दीन ओवैसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन यांनी १९८४ मध्ये पहिल्यांदा या जागेवरून लोकसभा निवडणुक जिंकली होती. या जागेवरून ते २० वर्ष खासदार होते. यानंतर आता असदुद्दीन ओवैसी या जागेवर नेतृत्व करत आहेत. तर, यंदाच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या विरोधात माधवी लता रिंगणात उतरल्या आहेत. (Madhavi Lata)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.