भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) यांची गुहागरमध्ये महायुतीची सभा पार पडली. यावेळी मधुकर चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “सावध व्हा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत जगात शक्तिशाली होईल. कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेऊन कामाला लागा. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय.” असं मधुकर चव्हाण म्हणाले. (Madhukar Chavan)
“उद्धव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात”
“अनंत गीते तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करताय? तुमचे नेतृत्व उध्दव ठाकरे हे लाचार आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यात कोणासमोर झुकले नाहीत. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात. सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकलात,” अशा शब्दात चव्हाणांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (Madhukar Chavan)
जाणता राजा म्हणवणाऱ्या शरद पवार यांना राजा कसा असतो हे माहिती आहे का?
“शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच (Sharad Pawar) आहेत. स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांना राजा कसा असतो हे माहिती आहे का?” असा सवालही मधुकर चव्हाण यांनी केला. (Madhukar Chavan)
हे पहा –