राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Madhukar Pichad यांचे निधन

367
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Madhukar Pichad यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Madhukar Pichad यांचे निधन

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड (Madhukar Pichad) यांचे दि. ६ डिसेंबर रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. पिचड यांना ब्रेनस्ट्रोक आल्याने नाशिक येथील नाईन पल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वयोमानामुळे उपचाराला प्रतिसाद देत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.

( हेही वाचा : आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची ‘लाडकी कंपनी योजना’ रद्द करा; डॉ. राहुल घुले यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र)

कोण होते मधुकरराव पिचड?

मधुकरराव पिचड (Madhukar Pichad) यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आदराने घेतले जाते. मधुकरराव पिचड (Madhukar Pichad) यांनी राष्ट्रवादीत असताना प्रदेशाध्यक्ष पद भुषवलं होतं. त्यानंतर त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणूनही काम केले. तसेच मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदही त्यानी भुषवले.

परंतु २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड (Madhukar Pichad) यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पिचड यांनी आपल्या मुलासह प्रवेश केला होता. पण, २०१९ च्या निवडणुकीत वैभव पिचड (Vaibhav Madhukar Pichad) यांचा पराभव झाला. त्यानंतर अलीकडेच पिचड यांनी शरद पवाराची भेट घेतली होती. त्यामुळे पिचड घरवापसी करतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र ऑक्टोबरला ब्रेनस्ट्रोक आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अखेर दि.६ डिसेंबर रोजी पिचड यांची प्राणज्योत मावळली. (Madhukar Pichad)

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.