Madhya Pradesh Assembly Elections : मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक: भाजपकडून केंद्रीय मंत्री आणि खासदार मैदानात

मुख्यमंत्र्याचे राजकीय विरोधक महासचिवही उतरले मैदानात

121
Madhya Pradesh Assembly Elections : मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक: भाजपकडून केंद्रीय मंत्री आणि खासदार मैदानात
Madhya Pradesh Assembly Elections : मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक: भाजपकडून केंद्रीय मंत्री आणि खासदार मैदानात

विशेष प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील (Madhya Pradesh Assembly Elections) उमेदवारांची दुसरी यादी काल सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी उशीरा जाहीर केली. यात भुवया उंचावणारी बाब म्हणजे, मुख्यमंत्री शिवराज चौहाण यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील (Madhya Pradesh Assembly Elections)भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर झाली आहे. यात तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांसह 39 उमेदवारांचा समावेश आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर (दिमानी), केंद्रीय  इस्पात राज्यमंत्री फगनसिंग कुलस्ते (निवास) आणि केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद पटेल (नरसिंगपूार) मतदारसंघातून उमेदवार देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, प्रल्हाद पटेल यांना त्यांचे बंधू विद्यमान आमदार जलमसिंग पटेल यांचे तिकीट कापून उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय, सिधीच्या खासदार रीती पाठक यांना सिधीमधूनच रिंगणात उतरविण्यात आले आहे. सतनाचे खासदार गणेश सिंग (सतना), होशंगाबादचे खासदार उदय प्रताप सिंग (गादरवारा) मधून रिंगणात उतरविण्यात आले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय हे इंदूर—1 मतदारसंघातून ताल ठोकणार आहेत.

आश्चर्याची बाब अशी की, मुख्यमंत्री शिवराज चौहाण यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूरमधून रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर, मुख्यमंत्री शिवराज चौहाण यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

भाजपच्या दुसऱ्या यादीतील नावे बघून केवळ भाजपचेच नव्हे तर कॉंग्रेस नेत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला लगाम लावण्यासाठी दिग्गजांना उमेदवारी दिली गेली अशी भाजपात चर्चा आहे. नवीन यादीत 11 नवीन चेहरे आहेत. भाजपने आपल्या पहिल्या यादीत त्या जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली होती जी 2018 च्या निवडणुकीत पराभव झाला होता.

(हेही वाचा-Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव नामांतराचा वाद पुन्हा एकदा न्यायालयात गाजणार)

भाजपातील सूत्रानुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांच्या नेत्यांमधील अंतर्गत गटबाजीला लगाम लावण्यासाठी सारखे दौरे केले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांमधील मळमळ दूर करून त्यांच्यात उत्साह भरण्याचे काम शाह यांनी केले असल्याची चर्चा आहे.

मध्यप्रदेशची निवडणूक (Madhya Pradesh Assembly Elections) जिंकण्यासाठी भाजप पूर्णपणे शिवराज चौहाण यांच्यावर अवलंबून राहिला होता. यामुळे अन्य नेते निवडणुकीच्या प्रचारात फारसे रस घेत नव्हते. 2008 पासून ही बाब सारखी निदर्शतान येत होती. यामुळे हायकमांडने यावेळी याची पुनरावृत्ती न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत एक नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आता पक्षाने नवीन आणि जुन्या नेत्यांना रिंगणात उतरविल्यामुळे ते निवडणुकीच्या प्रचारात रस घेतील, असेही पक्षाला वाटत आहे.

सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय

मध्य प्रदेशात जवळपास दोन दशकांपासून भाजपची सत्ता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही पराभवाला सामोरे जावे लागले पण नंतर काँग्रेसमधील बंडखोरीमुळे त्यांनी सरकार स्थापन केले. यावेळीही निवडणुकीचे वातावरण लक्षात घेऊन भाजपने सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने बड्या नेत्यांना तिकिटे दिली, यावरून भाजप काँग्रेसचे आव्हान अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे स्पष्ट होते.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.