Madhya Pradesh: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव

220
Madhya Pradesh: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव
Madhya Pradesh: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव

मध्य प्रदेशातील बैतूल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदान संपल्यानंतर ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या एका बसला मंगळवारी, (७ मे) मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या मारल्या.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसला लागलेल्या आगीत ३ ईव्हीएम मशीन जळाल्याची माहिती आहे. याशिवाय बसदेखील जळून खाक झाली आहे. इतर माहिती मात्र अद्याप समोर नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

(हेही वाचा – काय आहे जागतिक Red Cross Day? ‘या’ दिवशी काय केले जाते?)

आगीवर नियंत्रण
आगीवर नियंत्रण मिळवत बसमधील ईव्हीएम मशीन बाहेर काढण्यात आल्या आहेत. मतदान कर्मचारी आणि ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी मशीन आणण्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील ९४ लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडलं. यामध्ये मध्य प्रदेशातील मुरैना, भिंड, ग्वाल्हेर, गुना, सागर, विदिशा, भोपाळ, राजगढ आणि बैतूल या ९ मतदारसंघाचा देखील समावेश होता. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात ६६.१२ टक्के मतदान झाले असून कुठूनही अनुचित प्रकार घडला नाही.

३ ईव्हीएम मशीन जळल्याची प्राथामिक माहिती
मात्र, बैतूल येथील ६ मतदान केंद्रावरून ईव्हीएम मशीन आणि कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या एका बसला मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच कर्मचाऱ्यांनी बसमधून उड्या घेतल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, मात्र आगीत ३ ईव्हीएम मशीन जळल्याची प्राथामिक माहिती आहे. सध्या पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.