मध्य प्रदेश महापालिका निवडणुका निकालः भाजपचे कमळ खुलले, पण ‘हे’ गड हातून निसटले

89

महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या मध्य प्रदेशात नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली असली, तरी भाजपच्या गडांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. 11 पैकी 7 महापालिकांमध्ये भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून, तीन महापालिकांवर काँग्रेस तर एका महापालिकेवर आपने आपला झेंडा फडकावला आहे. रविवारी रात्री या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत.

भाजपच्या हाती ‘सात’, इथे मिळाली ‘मात’

या निवडणुकांत भाजपला जरी यश मिळाले असले तरी महत्वाच्या महापालिकांवर भाजपला पराभवाचा सामना केल्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे. एकेकाळी राज्यातील सर्वच महापालिकांवर सत्ता असलेल्या भाजपने या निवडणुकांमध्ये इंदौर,भोपाळ,बु-हाणपूर,उज्जैन,सतना,खंडवा आणि सागर या सात महापालिकांवर विजय मिळवला आहे. तर ग्वाल्हेर,जबलपूर, छिंदवाडा या तीन महापालिकांवर काँग्रेसने हात उंचावला आहे.

(हेही वाचाः हवा येऊ द्या मध्ये शहाजी बापूंचे पडले ‘पितळ’ उघडे)

पुढील वर्षी मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूक होणार असल्याने या तीन महापालिका गमावणं हे भाजपसाठी धोकादायक असून, ही काँग्रेसला बळ देणारी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे.

57 वर्षांनी कमळ कोमेजले

मध्य प्रदेशात एकूण 16 महापालिका असून, या सर्व महापालिकांवर याआधी भाजपची सत्ता होती. पण भाजपने आता चार महापालिका गमावल्या आहेत. मुख्य म्हणजे तब्बल 57 वर्षांनी भाजपला ग्वाल्हेर महापालिकेत भाजपने आपली सत्ता गमावली आहे. तर जबलपूरमध्ये 23 वर्षांनी कमळ कोमेजले आहे.

(हेही वाचाः राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या गेटवर BUS ला अपघात)

ग्वाल्हेर ही केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या राजघराण्याची राजधानी समजली जाते. या ग्वाल्हेरमधून भाजपचे दोन केंद्रीय मंत्री तर मध्य प्रदेस सरकारचे पाच मंत्री आहेत. त्यामुळे ग्वाल्हेरमधला हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.