Madhya Pradesh : कुणाची सत्ता येणार? भाजपचे काय होणार? काय सांगते आकडेवारी?

168

सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापलेले. या पाच राज्यातील निवडणुका येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक लक्ष लागले आहे ते मध्य प्रदेशवर.

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बाजी मारणार की काँग्रेस परिवर्तन घडवणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वीचा शेवटचा सर्व्हे शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी समोर आला आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या या सर्व्हेमध्ये २३० जागांपैकी मध्य़ प्रदेशमध्ये भाजपाला ११९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १०७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. इतरांच्या खात्यामध्ये ४ जागा जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य प्रदेश (Madhya Pradesh)च्या मुख्यमंत्रिपदासाठी सर्व्हेमध्ये मतदारांनी शिवराज सिंह चौहान यांनाच प्रथम पसंती दर्शवली आहे. या सर्व्हेनुसार ४३ टक्के मतदारांनी शिवराज सिंह चौहान यांना मुख्यंमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. तर ४० टक्के मतदारांनी कमलनाथ यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्याशिवाय ११ टक्के मतदारांनी ज्योतिरादित्य शिंदे आणि १ टक्का मतदारांनी दिग्विजय सिंह यांच्या नावाला पसंती दिली आहे.

(हेही वाचा Maratha Reservation : आता कुणबी नोंदी शोधण्याचे काम राज्यभर होणार; मुख्यमंत्र्यांचा काय आहे ऍक्शन प्लॅन?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.