मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सोमवारी महापालिकेच्या ‘एल’ विभाग (कुर्ला) कार्यालयात स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिराला उपस्थित राहिले. हा कार्यक्रम सुरू असताना मध्येच विजप्रवाह खंडीत झाल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. दिवे, पंखे, एसी, माईक बंद पडल्याने तक्रादारांच्या समस्या मंत्रीमहोदयांना ऐकता आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी ‘खास शैलीत’ नाराजी व्यक्त केल्याने पालिका अधिकाऱ्यांना घाम फुटला.
राज्यातील महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी, त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिरा’चे आयोजन पालिकेच्या प्रत्येक विभागात केले जात आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. सोमवारी महापालिकेच्या ‘एल’ विभाग कार्यालयात स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिरालाही ते उपस्थित राहिले. मात्र कार्यक्रमादरम्यान १० ते १५ मिनिटे विजप्रवाह खंडीत झाल्याने सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला.
(हेही वाचा Congress : काँग्रेस करत आहे लोकसभेसाठी सर्व जागांचे सर्वेक्षण; महाविकास आघाडीची वज्रमूठ होणार सैल?)
एसी, पंखे बंद पडले. माईक बंद पडल्याने तक्रादारांच्या समस्या मंत्री महोदयांना ऐकता येत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. या शिबिराला लोढांसह स्थानिक लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी, पोलीस, म्हाडा, एसआरए, जिल्हाधिकारी कार्यालय, अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, या शिबिरासाठी लाखो रुपये खर्च करूनही बैठक अंधारातच पार पडल्याने तक्रारी सोडवण्याच्या आशेने आलेल्या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community