Maghi Ganeshotsav 2025 : माघी गणेशोत्सवावरून आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

39
Maghi Ganeshotsav 2025 : माघी गणेशोत्सवावरून आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Maghi Ganeshotsav 2025 : माघी गणेशोत्सवावरून आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

माघी गणेशोत्सवातील पॉपच्या (PoP) मूर्ती अडचणीत आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करत आदित्य ठाकरे यांना ढोंगी” संबोधले असून, त्यांच्यावर गणेशोत्सव आणि हिंदू सणांविषयी ढोंगी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. (Maghi Ganeshotsav 2025)

(हेही वाचा- PM Modi In France : पंतप्रधान मोदींची मार्सेलिस भेट; स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण, मार्सेलिसच्या जनतेचे आभार)

शेलारांचा आरोप: ‘तुम्ही गणेशोत्सवाचे खरे समर्थक नाही’

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये आरोप केला की, ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बंद करण्याचे प्रयत्न झाले. लालबागच्या राजाची परंपरा खंडित करण्यात आली, मात्र आता माघी गणेशोत्सवावर बोलण्याचा अधिकार आदित्य ठाकरे यांना नाही. (Maghi Ganeshotsav 2025)

शेलार यांनी पुढे म्हटले की, गणेशोत्सव असो वा दहीहंडी उत्सव, जेव्हा जेव्हा हे सण अडचणीत आले, तेव्हा आदित्य ठाकरे किंवा त्यांचे पक्षाचे नेते न्यायालयात बाजू मांडण्यासाठी कधीच गेले नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांनी अयोध्येतील राम मंदिर, हिंदू देवदेवता आणि मंदिरांविरोधातही भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. (Maghi Ganeshotsav 2025)

(हेही वाचा- Safer Internet Day निमित्त राज्यभर जनजागृती मोहीम)

‘अजान स्पर्धा करणारे, गणेश आरतीपासून दूर राहणारे’

शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आणखी एक टीका करताना म्हटले की, जे अजान स्पर्धा आयोजित करतात, ज्यांना भोंग्यांचा आवाज सुमधुर वाटतो आणि गणपतीची आरती करणे टाळतात, ते माघी गणेशोत्सवावर बोलतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Maghi Ganeshotsav 2025)

शेलार यांच्या मते, हिंदू सणांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या नेत्यांनी आता गणेशभक्तांमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी हे देखील म्हटले की, महाराष्ट्रातील गणेशभक्त या गोष्टीपासून सावध झाले आहेत आणि आता गणपती बाप्पानेही हे ढोंगी रूप पाहावे. (Maghi Ganeshotsav 2025)

(हेही वाचा- Virat Kohli ला एकदिवसीय क्रिकेटमध्ये खुणावतोय मोठा विक्रम; १४,००० धावा पूर्ण करण्यासाठी ‘इतक्या’ धावा बाकी)

शेलार-ठाकरे संघर्ष आणखी तीव्र?

आशिष शेलार यांचे हे ट्विट आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत देत आहे. गणेशोत्सव, हिंदू सण आणि धर्म याभोवती राजकीय घडामोडी फिरत असल्याने, या वादाला आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maghi Ganeshotsav 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.