महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यात ३ मे रोजी महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मनसेकडून रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ३० एप्रिल रोजी मनसे, विश्व हिंदू परिषद आणि बजरंद दल यांनी एकत्र येऊन पुण्यातील सर्व मुख्य मंदिरात भोंगे लावून आरती करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून आणि मनसेचे राज्य प्रवक्ते योगेश खैरे यांनी मनसेचा पुण्यातील अक्षय्य तृतीयेला आयोजित करण्यात आलेल्या महाआरती करण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. मनसे आणि हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने पुण्यात प्रत्येक शाखेत महाआरती कऱण्यात येणार होती. दरम्यान, ३ मे रोजी रमजान ईद असल्याने त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सध्यातरी स्थगित करण्यात आला आहे.
(हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या घोटाळ्याची लंका कधीही जळू शकते, सोमय्यांचा इशारा)
काय म्हणाले योगेश खैरे…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. जर ते काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान देखील दिले होते. राज ठाकरेंच्या आदेशानुसार, ३ तारखेला ईद असल्याने हनुमान चालिसा लावली जणार नाही. यावरून मनसे पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. ईदचा सण पार पडू देणार, त्यानंतरही मशिदींवरील भोंगे सुरू राहिल्यास ४ तारखेनंतर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावली जाणार, असे मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी सांगितले. मनसेने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील सर्व मंदिरांमध्ये भोंगे लावून महाआरती करण्यात येईल, असे सांगितले आणि तशा सूचना देखील विभाग प्रमुखांना देण्यात आल्या होत्या. या महाआरतीच्या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल देखील सहभागी होणार होते. या पत्रकार परिषदेत दोन्ही संघनांचे पदाधिकारीही सहभागी होते.
तूर्तास एवढंच म्हणत राज ठाकरेंचे ट्विट
दरम्यान, सोमवारी राज ठाकरेंनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले, उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Communityमहाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022