प्रयागराज (Prayagraj) येथे होणाऱ्या महाकुंभतील (Maha Kumbh 2025) भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षेच्या आघाडीवर मोठे पाऊल उचलले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच अंडरवॉटर ड्रोन तैनात (underwater drones) करण्यात आले आहेत. हे ड्रोन २४ तास पाण्याखाली पाळत ठेवतील आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची अचूक माहिती संबंधित अधिकाऱ्यांना पुरवतील. (Maha Kumbh 2025)
अंधारातही अचूक नजर ठेवण्यास सक्षम
अंडरवॉटर ड्रोन 100 मीटर खोलीपर्यंत जाऊन प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू शकतो. हे अंधारातही काम करण्यास सक्षम आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली त्वरित ओळखू शकते. सीएम योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार हा पुढाकार घेण्यात आला आहे, जेणेकरून जमीन, आकाश आणि पाण्यावर पाळत ठेवता येईल. हे ड्रोन अमर्याद अंतरावर काम करू शकते आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ कारवाईसाठी अलर्ट पाठवते. (Maha Kumbh 2025)
महाकुंभतील सुरक्षेला नवे आयाम मिळणार
हा अंडरवॉटर ड्रोन प्रयागराज येथील पूर्व विभागाचे प्रभारी पोलीस महानिरीक्षक डॉ. राजीव नारायण मिश्रा यांच्या हस्ते लॉन्च केला. या तंत्रज्ञानामुळे महाकुंभतील सुरक्षेला नवे आयाम मिळणार आहेत. पाण्याखालील कोणत्याही संशयास्पद हालचाली ओळखून, हे ड्रोन आय ट्रिपल सी (इंटिग्रेटेड कंट्रोल कमांड सेंटर) (Integrated Control Command Center) माहिती पाठवेल. (Maha Kumbh 2025)
७००हून अधिक बोटी
या भव्य सोहळ्यात ४५ कोटींहून अधिक तीर्थयात्री सहभागी होण्याची शक्यता आहे. संगम स्नानादरम्यान प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा करण्यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याखाली कार्यरत असलेले हे ड्रोन २४ तास देखरेख करतील आणि कमी प्रकाशातही कार्यक्षम असतील. याशिवाय ‘टेथर्ड ड्रोन’ हवाई क्षेत्राचे संरक्षण करतील. पाण्यावर नजर ठेवण्यासाठी पीएसी (प्रांतीय सशस्त्र पोलिस), एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल), एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) यांच्या कर्मचाऱ्यांसह ७००हून अधिक बोटी तैनात राहणार आहेत. सुरक्षेसाठी रिमोट-नियंत्रित ‘लाइफबॉय’ (सुरक्षा यंत्र) उपकरणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. (Maha Kumbh 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community