Maha Kumbh stampede: प्रयागराज महाकुंभ दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी केली ‘एक्स’ पोस्ट, रेल्वेमंत्र्यांशीही बोलले

82

उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj in Uttar Pradesh) येथे सुरू असलेल्या महाकुंभासाठी करोडो लोक जमले आहेत. बुधवारी सकाळी मौनी अमावस्येच्या दिवशी साडेतीन कोटींहून अधिक लोक यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगम (Triveni Sangam) येथे स्नान करण्यासाठी जमले होते. मात्र, बुधवारी सकाळी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास महाकुंभात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून त्यात अनेक जण जखमी आणि मृत झाले आहेत. महाकुंभ परिसरातील परिस्थिती आता नियंत्रणात असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक्स’वर पोस्ट करत महाकुंभ येथील दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. (Maha Kumbh stampede)

काय म्हणाले पीएम मोदी?

महाकुंभात झालेल्या अपघाताबाबत पीएम मोदी म्हणाले – प्रयागराजमध्ये झालेला अपघात अत्यंत दुःखद आहे. कुटुंबातील सदस्य गमावलेल्या भक्तांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. सर्व जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोललो असून राज्य सरकारच्या सतत संपर्कात आहे. (mahakumbh stampede pm narendra modi tweets)

(हेही वाचा – Maharajas Express : अरे बापरे! लाखो रुपये आहेत महाराजा ट्रेनची तिकीट! एवढी काय सुविधा देतात?)

पंतप्रधान मोदींनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली 

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रयागराजमधील भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेल्वेच्या तयारीची पंतप्रधान मोदींनी माहिती घेतली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान मोदींना प्रयागराजमध्ये रेल्वेने केलेल्या व्यवस्थेची माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Saptashrungi Temple : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी मंदिर; जाणून घ्या मंदिराचा दिव्य इतिहास!)

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी पीएम मोदींना सांगितले- बुधवारी प्रयागराजमधून 360 हून अधिक ट्रेन धावत आहेत. रेल्वेमंत्र्यांनी पीएम मोदींना सांगितले की, प्रयागराजच्या अनेक रेल्वे स्थानकांवर दर 4 मिनिटांनी एक ट्रेन येत आहे. गर्दी नियंत्रणासाठी प्रयागराजच्या सर्व रेल्वे स्थानकांवर आरपीएफ आणि जीआरपीचे जवान तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांना कलर कोडनुसार स्थानकावर प्रवेश दिला जात आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.