Maha kumbh मध्ये कोट्यवधींच्या उलाढालीने अर्थव्यवस्थेला मोठी गती; उद्योग महासंघाचा दावा काय ?

67
Maha kumbh मध्ये कोट्यवधींच्या उलाढालीने अर्थव्यवस्थेला मोठी गती; उद्योग महासंघाचा दावा काय ?
Maha kumbh मध्ये कोट्यवधींच्या उलाढालीने अर्थव्यवस्थेला मोठी गती; उद्योग महासंघाचा दावा काय ?

देश-विदेशातून महाकुंभाच्या (Maha kumbh) निमित्ताने पवित्र स्नानासाठी भाविक येत आहेत. महाकुंभ २०२५ हा केवळ श्रद्धा आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू नाही, तर भारताच्या सांस्कृतिक (Cultural) आणि आर्थिक (Financial) ताकदीचे प्रतीक आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या कुंभमेळ्यामुळे (Maha kumbh) देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली असून आतापर्यंत लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती भारतीय व्यापारी उद्योग महासंघाने (Federation of Industries) दिली आहे. हा आजवरचा विक्रम असल्याचा दावाही महासंघाने केला आहे. (Maha kumbh 2025)

हॉटेलसह संबंधित सेवा क्षेत्राला मोठा लाभ
सुरुवातीला ४० कोटी भाविक व दोन लाख कोटींची उलाढाल होईल असा अंदाज होता. मात्र आता भाविकांचा आकडा साठ कोटींवर गेला असून आर्थिक व्यवहारही तीन लाख कोटींवर जाण्याचा विश्वास महासंघाचे सरचिटणीस व खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केला. केवळ प्रयागराहॉटेलसह संबंधित सेवा क्षेत्राला मोठा लाभ जच नव्हे तर वाराणसी आणि अयोध्येलाही भाविक भेट देत आहेत. त्यामुळे त्या शहरांतील हॉटेलसह संबंधित सेवा क्षेत्राला मोठा लाभ झाला आहे. (Maha kumbh)

पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर खर्च
उत्तर प्रदेशात इतरत्रही वैद्याकीय सेवा तसेच तंत्रज्ञान क्षेत्रालाही महाकुंभचा लाभ झाल्याचे खंडेलवाल म्हणाले. महाकुंभाचा कार्यकाळ वाढविण्याची मागणी करण्यात आली असली तरी नियोजित वेळेतच सोहळा संपुष्टात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महाकुंभ निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुमारे साडेसात हजार कोटींची गुंतवणूक केली. रस्ते, उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांची उभारणी करण्यात आली. दीड हजार कोटींची रक्कम पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर खर्च करण्यात आली आहे. (Maha kumbh)

नौकानयनातून १,००० कोटींची उलाढाल
प्रयागराजमधील यमुना नदीतील ३० किमीच्या विस्तीर्ण पात्रात जवळपास दहा हजार नौका आहेत. याच्या माध्यमातून भाविकांना कुंभकाळात स्नान घडवले जाते. एका नौकेवर साधारण तिघे असतात. सध्या येथे लखनऊ तसेच वाराणसी परिसरातून नौका आणण्यात आल्या आहेत. प्रति नौका साधारणपणे दहा हजार रुपये आकारले जातात. एका नौकेच्या तीन फेऱ्या होतात. त्यांना तीस हजार रुपये मिळतात. आठ ते दहा जण यामध्ये बसतात. मात्र कुंभकाळातच व्यवसाय होतो. (Maha kumbh)

महाकुंभामध्ये यमुनेतील नौकानयनातून ४६ दिवसांत एक हजार कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात एक लाखावर जणांना रोजगार मिळत आहे. महाकुंभमध्ये आत्तापर्यंत साठ कोटी भाविकांनी प्रयागराजला भेट दिली. मात्र ही संख्या मोजण्यासाठी ‘एआय’ची मदत घेण्यात आली. बहुराष्ट्रीय कंपनीला हे काम देण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या आकड्याच्या आधारे हे मोजमाप केले जात असल्याचे एकात्मिक समन्वय केंद्राचे प्रमुख अमितकुमार यांनी स्पष्ट केले. (Maha kumbh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.