‘निर्णय वेगवान, सरकार गतिमान’, अशी जाहिरात हल्ली प्रत्येक वाहिनीवर नजरेस पडत आहे. पण महाविकास आघाडीच्या तुलनेत शिंदे-फडणवीस (युती) सरकार खरेच गतिमान आहे का, हे पाहण्यासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने दोन्ही सरकारांच्या काळातील विधानसभा अधिवेशनातील कामकाजाचा अभ्यास केला आणि त्यांची मार्कशीट तयार केली आहे.
( हेही वाचा : युरोप, अमेरिकेत आढळलेले कोरोनाचे व्हेरियंट आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरात )
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केले. हे सरकार अडीच वर्षे टिकले. त्यांच्या कार्यकाळात सात अधिवेशने झाली. त्यात केवळ ५२ दिवस कामकाज चालले. २०२० आणि २०२१ मधील अधिवेशने कोरोनाचे कारण पुढे करीत अल्पकालीन घेण्यात आली. त्यामुळे या अल्पकालीन अधिवेशनांचा परिणाम निर्णय प्रक्रियेवरही झालेला दिसून आला.
महाविकास आघाडीला धक्का देत सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारला १० महिने पूर्ण झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत ३ अधिवेशने झाली. त्यात आतापर्यंतचे विक्रमी कामकाज झाले आहे. उपरोक्त तिन्ही अधिवेशनांचे मिळून एकूण ३६ दिवस कामकाज चालले. त्यामुळे या कामगिरीवरून गुण द्यायचे झाल्यास शिंदे-फडणवीस सरकार अव्वल ठरत आहे.
शिंदे-फडणवीस सरकारची १० महिन्यांतील कामगिरी
पावसाळी अधिवेशन – २०२२
- एकूण दिवस – ६
- प्रत्यक्षात झालेले कामकाज – ५७ तास २५ मिनिटे
- तारांकित प्रश्न : एकूण प्राप्त ४८१५, स्वीकृत प्रश्न : २५१, सभागृहात उत्तरित झालेले प्रश्न : २२
- लक्षवेधी सूचना : एकूण प्राप्त सूचना ८६२, स्वीकृत सूचना ९४, चर्चा झालेल्या सूचना, ३७
हिवाळी अधिवेशन – २०२२
- एकूण दिवस – १२
- प्रत्यक्षात झालेले कामकाज – ८४ तास १० मिनिटे चालले.
- तारांकित प्रश्न : प्राप्त ६८४६, स्वीकृत ४२२, सभागृहात उत्तरित झालेले प्रश्न : ३६
- लक्षवेधी – प्राप्त २०२८, स्वीकृत ३३२, चर्च १०६
अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२३
- एकूण दिवस – १८
- विधानसभेचे प्रत्यक्ष कामकाज – १६५ तास ५० मिनिटे
- लक्षवेधी सूचना – २ हजार ५५६ प्राप्त झाल्या, त्यापैकी ५३५ स्वीकृत झाल्या, त्यातील १४५ सूचनांवर चर्चा झाली.
- तारांकित प्रश्न – ७ हजार ९८१ तारांकित सूचना प्राप्त, त्यापैकी ५०३ स्वीकृत, तर ५५ उत्तरित झाल्या.
उद्धव ठाकरे सरकारची अडीच वर्षांतील कामगिरी
अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२२
- एकूण दिवस १५
- प्रत्यक्ष कामकाज – ७ तास १० मिनिटे
- तारांकित प्रश्न : प्राप्त ६६९८, स्वीकृत ६९६, सभागृहात ६४ प्रश्न उपस्थित करण्यात आले.
- एकूण १७८७ लक्षवेधी सूचना प्राप्त. त्यापैकी स्विकृत २७४. ८० लक्षवेधी सूचनांवर चर्चा.
- अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१
एकूण कामकाज – ८ दिवस (१ ते १० मार्च) - पावसाळी अधिवेशन २०२१
एकूण कामकाज – २ दिवस (५ आणि ६ जुलै) - हिवाळी अधिवेशन २०२१
एकूण कामकाज – ५ दिवस (२२ ते २८ डिसेंबर) - अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२०
एकूण कामकाज -१८ दिवस (२४ फेब्रुवारी ते २४ मार्च) - पावसाळी अधिवेशन – २०२०
एकूण कामकाज- २ दिवस (७ आणि ८ सप्टेंबर) - हिवाळी अधिवेशन – २०२०
एकूण कामकाज- २ दिवस (१४ आणि १५ डिसेंबर)