विधानसभा निवडणुकीत Maha Vikas Aghadi चे २८ उमेदवार तिसऱ्या स्थानावर, वाचा उमेदवारांची नावे

69
विधानसभा निवडणुकीत Maha Vikas Aghadi चे २८ उमेदवार तिसऱ्या स्थानावर, वाचा उमेदवारांची नावे
विधानसभा निवडणुकीत Maha Vikas Aghadi चे २८ उमेदवार तिसऱ्या स्थानावर, वाचा उमेदवारांची नावे

महायुतीच्या अभुतपूर्व विजयादरम्यान महाविकास आघाडीला जोरदार धक्का लागला आहे. विधानसभेच्या २८८ पैकी २९ जागांवर मविआचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. या २९ जागांपैकी शिवसेना उबाठाचे १७ उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले तर एक उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० जागांवर तर मविआने ४६ जागांवर विजय मिळवला. तर १० जागांवर अपक्षांनी विजय मिळवला आहे. (Maha Vikas Aghadi)

हेही वाचा : Maharashtra Election Results 2024 : मुंबईत ३२ पैकी २५ विद्यमान आमदार पुन्हा विजयी;, मात्र कुणाचे मताधिक्य घटले? 

विधानसभेत भाजपाने १३२ जागा मिळाल्या असून शिवसेना पक्षाला ५७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच महायुतीची बेरीज २३० झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (उबाठा) २० जागा, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) १० जागांवर विजयी ठरले आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) बेरीज ५६ झाली आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारूण पराभव झाल्याचं सिद्ध झालं आहे. तरीही मविआमध्ये शिवसेना उबाठा पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र ठाकरेंचे १८ उमेदवार दुसरे स्थानावर राहिले. तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील उमेदवार गणेश धात्रक (Ganesh Jagannath Dhatrak) चौथ्या क्रमांकावर राहिलेत. या जागेवर शिवसेनेचे सुहास कांदे (Suhas Kande) विजयी झाले असले तरी अपक्ष उमेदवार रोहन बोरसे धात्रक यांच्या पुढे असून तिसऱ्या क्रमांकावर होते. (Maha Vikas Aghadi)

ऐरोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाचे मनोहर मढवी (Manohar Madhavi) तिसऱ्या क्रमांकावर होते. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना उबाठाचे उमेदवार सुभाष भोईर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मनसेचे प्रमोद (राजू) पाटील दुसऱ्या स्थानावर आहेत. तसेच मविआतील काँग्रेसचे उमेदवार वरोरा, वसई, सोलापूर शहर मध्य, औरंगाबाद पूर्व, अमळनेर आणि अचलपूर येथे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. पंढरपूर, मोर्शी, चंदगड, आष्टी आणि अहेरी येथे मविआतील (Maha Vikas Aghadi) राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे उमेदवारही तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. यासगळ्यात भाजपाचा एकही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर नाही. (Maha Vikas Aghadi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.