महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला राज्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही दिवसांत योजनेवर टीका करूनही लोक दुर्लक्ष करत असल्याने मंगळवारी बदलापूर घटनेच्या आडून महाविकास आघाडीने लाडकी योजनेवर पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.
फेक नरेटीव्ह
लोकसभा निवडणुकीत महिलांना महिना ८,००० रुपये देण्याचे आश्वासन देणाऱ्या ‘इंडी’ आघाडीचे घटक पक्ष आता लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहेत. बदलापूर घटनेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लाडकी बहीण’ योजना नको, असे फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘महिलांना १५०० रुपये देणारी लाडकी बहीण योजना नको आहे तर महिलांची सुरक्षा हवी,’ अशा शब्दांत बदलापूर घघटनेशी लाडकी बहीण योजना जोडली.
(हेही वाचा – Badlapur School Case: विरोधक संवेदनशील विषयाचे राजकारण करत आहेत – मुख्यमंत्री शिंदे)
योजना बोगस
शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी तर लाडकी बहीण योजना बोगस आहे असे म्हटले. ते म्हणाले, “ लाडकी बहीण योजनादेखील बोगस आहे, नौटंकी आहे,” असा आरोपही त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी राऊत म्हणाले होते की महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यास ‘लाडकी बहीण’ योजनेचे १५०० रुपये आहेत ते ३००० रुपये करू.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही योजनेवर टीका केली. लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटून घ्याल. पण महिलांचं संरक्षण करणार नाही, तर महिला काय मागतील… संरक्षण की पैसे? महिलांनी संरक्षण मागितलं तर त्यामध्ये कोणतं राजकारण आलं?” अशा शब्दात वडेट्टीवार यांनी योजनेवर तोंडसुख घेतले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community